सावदा प्रतिनिधी प्रशांत सरवदे :- निंभोरा बुद्रुक तालुका रावेर येथील तरुण कपिल अशोक वारके (माऊली मेडिकल निंभोरा) (वय ३३) हे सावद्याहून निंभोरा शुक्रवार रात्री येथे परत येत असताना वाघोदा येथील श्री शनी मंदिराजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक देत घटनास्थळावरून पोबारा केला धडक इतकी जबरदस्त होती की, कपिल वारके यांच्या डोक्याला मार लागून डोक्याचा काही भाग बाहेर निघाला व ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना रावेर येथे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले. पुढील तपास सावदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे व सहकारी करीत आहेत.
दरम्यान मयत कपिल वारके यांचा मेडिकल व्यवसाय असून गावातील प्रत्येक चांगल्या कार्यात भाग घेणारे असल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. कपिल हे निंभोरा येथील न्यू इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक ए एच वारके यांचे मोठा मुलगा होत. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे व झुंजार न्युज पोर्टल परिवार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली