१९ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, दोघांनी कोर्टात जाऊन केलं लग्न; पण नंतर झाल मॅटर!

Spread the love

आग्रा :- प्रेम हे आंधळं असतं असं म्हटलं जातं पण इथं मात्र नात्याचा विसर पडल्याची घटना समोर आली आहे. १९ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात मामी वेडी झाली पण या नात्याला घरच्यांनी नकार दिला.पण दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके वेडे झाले की दोघांनी कोर्टात जाऊन लग्नही केलं. भाच्याच्या या कृत्यामुळे दोन्ही घरात आग लागली आणि या वादातून घरातील एका महिलेचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील आग्रा इथं ही घटना घडली आहे. गीता असं मृत महिलेचं नाव आहे. गीताचा मृतदेह एका पोत्यात मृतदेह आढळून आला. ही हत्या कोणी केली हे अद्याप उघड झालेलं नाही, परंतु या प्रकरणी तीन जणांवर संशय आहे. मृत महिलेचा मुलगा, भाऊ आणि वहिनी हे सध्या तिघेही फरार आहेत.

मामीचा आला भाच्यावर जीव

मृत गीताच्या मुलाचा आपल्याच मामीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. हे प्रकरण इतकं पुढे गेलं की, दोघांनीही कोर्ट मॅरेजही केलं होतं. पण मामाला हे अजिबात आवडलं नाही. यामुळे मृत महिलेचं तिच्या भावाशी अनेक वेळा वाद झाला. पोलिसांनी सांगितले की, मृत गीता देवी आणि तिचा पती प्रताप सिंह हे तेधी बागिया येथील माता वाली गल्ली इथं राहत होते. दोघेही मजूर करून आपलं पोट भरत होते. त्यांना तीन मुलं आहेत. मोठा मुलगा भुरा १९ वर्षांचा आहे. गीताचा भाऊ रवी त्याची पत्नी रोशनीसोबत तिच्या घरासमोर राहत होता. भुरा आणि रोशनी कधी एकमेकांच्या प्रेमात पडले हे कोणालाच कळलं नाही. मग दोघेही लग्न करण्याचा विचार करू लागले. जेव्हा गीताच्या भावाला या प्रकरणाबद्दल कळलं तेव्हा त्याला धक्का बसला. दरम्यान, १६ फेब्रुवारी रोजी भुरा त्याची मामी रोशनीसोबत घरातून पळून गेला. जवळपास ८ दिवसांनंतर वल्लभगडमध्ये भुरा सापडला. कुटुंब तिला परत घेऊन आले आणि रोशनी देखील दोन दिवसांनी घरी परतली.

रवी-गीताच्या कुटुंबात राडा

पत्नी घरातून पळून गेल्यावर रवी आणि गीताच्या कुटुंबात कडाक्याचं भांडण झालं. गावात पंचायत बोलावण्यात आली होती. प्रतापची बहीण, म्हणजेच गीता देवीची वहिनी देखील पंचायतीत सामील झाली. पंचायतीतही दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला. त्यानंतर भुरा आणि रोशनी पोलीस स्टेशनला पोहोचले. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दोघांनी लग्न करण्याची विनंती केली.

कोर्टात जाऊन केलं लग्न

त्यानंतर १ मार्च रोजी रोशनी आणि भूरा याने कोर्टात जाऊन लग्न केलं. कोर्ट मॅरेजमुळे दोन्ही कुटुंबांमधील तणाव वाढला. दरम्यान, अशातच गीताचा मृतदेह सापडला आहे. गीताची हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. गावातील रस्त्यावर तिचा मृतदेह एका पोत्यात आढळून आला. या प्रकऱणी संशय गीताच्या भावावर येत आहे. गीताच्या भावाने रागाच्या भरात गीताची हत्या केली असा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. सध्या तो फरार आहे. पण गीताचा मुलगा भुरा आणि रोशनी हे देखील फरार आहेत. दोघांवरही हत्येचा संशय आहे. पोलिसांनी तिघांचा शोध सुरू केला आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी