Viral Video: पुणे:- दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनामध्ये वाढ होत चालली आहे त्यामुळे पुणे आहे की बिहार अशी विचारणा केली जात आहे. अशातच पुण्यातील लोणीकाळभोर कदमवाकवस्तीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अगदी क्षुल्लक कारणावरून ५ ते ६ महिलांमध्ये फ्री स्टाईल मारामारी झाली. या मारामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलांच्या दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती याठिकाणी घडली. ग्रामपंचायत हद्दीतील इराणी वस्तीत किरकोळ कारणावरून दोन महिलांच्या गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत एक महिला आणि पुरुष असे दोघेजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार गणेश सातपुते, संभाजी देवकर, विलास शिंदे, शैलेश कुदळे, राहुल कर्डिले, शिल्पा हरिहर, मीना वाघाडे, कोमल आखाडे, दीपाली पाडूळे आणि त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती हाताळून दोन्ही जखमींना उपचारासाठी दवाखान्यात पाठविले आहे. पुढील कारवाई लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.