जळगाव – मुंबई – उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार व परिवहन मंत्री यांच्या आवाहनानुसार 8 ते 15 एप्रिल दरम्यान जळगाव विभागात सुमारे 4193 कर्मचाऱ्यांपैकी 3500 च्यावर कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बऱ्याच मार्गावर एसटी बऱ्यापैकी धावू असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात 15 एप्रिल दरम्यान 137 चालक, 160 वाहक,4 वाहक कम चालक 84 कार्यशाळा कर्मचारी आणि 6 प्रशासकीय कर्मचारी असे एकूण 391 कर्मचारी जळगाव विभागात कामावर हजर झाले होते. विभागात 4193 एसटी कर्मचारी कार्यरत असून सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसात जवळपास 75 % टक्के एसटीचे कर्मचारी कामावर परतले आहेत. यात 1059 चालक, 1094 वाहक 94 चालक कम वाहक, 785 यांत्रिक, 482 प्रशासकीय असे एकूण 3514 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. यामुळे जळगाव आगरासह अन्य 11 आगारात देखील विविध मार्गावर प्रवासी बस फेऱ्यात वाढ झाली असल्याचे जळगाव विभाग प्रमुख भगवान जगनोर यांनी म्हटले आहे.