नागपूर :- प्रेमाला वयाचा बंधन नसते. प्रेम कधी आणि कोणासोबत होईल हे सांगणे जरा कठीणच झाले आहे. असाच प्रत्यय नागपूरमध्ये आला आहे. या घटनेत एका ३६ वर्षीय महिलेचे अल्पवयीन मुलांसोबत प्रेम जुडले.परंतु या महिलेला अल्पवयीन मुलासोबत प्रेमसंबंध चांगलेच महागात पडले असून सध्या महिला पोलीस कोठडीत पोहचली आहे.
नागपुरातील लकडगंज पोलीस स्टेशन अंतर्गत हा प्रकार घडला आहे. याच परिसरात वास्तव्यास असलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर सदर ३६ वर्षीय महिलेचे प्रेम जडले. महिलेने या मुलाला आपल्या प्रेमात ओढले. यानंतर तिने मुलाला फुस लावून पळवून नेलं. अल्पवयीन मुलांसोबत प्रेमसंबंध जुळल्याने तो महिलेसोबत निघून गेला होता. परंतु मुलगा घरी न आल्याने घरच्यांनी अपहरण झाल्याची तक्रार लकडगंज पोलिसांत नोंदवली.
चार महिने राहिले सोबत
तक्रार दाखल झाल्याने पोलिसांनी तपासास सुरवात केली. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर पोलिसांना मिळून आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलाला महिलेने पळवून नेल्याचे दिसून आले होते. त्यानुसार तपास सुरु केला. आरोपी महिलेचे आणि मुलाचे प्रेम संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून महिलेनं मुलाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून पळून बालाघाट येथे घेऊन गेली होती. ते दोघेही तिथं चार महिने राहिले. मात्र मुलाचा शोध लागला नव्हता.
मुलाने पोस्ट शेअर केल्याने लागला शोध
याच दरम्यान मुलाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेयर केल्यानंतर बालाघाटला असल्याचं समजलं. त्यानंतर नागपूर पोलिसांनी महिलेचा आणि मुलाचा शोध घेत बालाघाट येथून दोघांना नागपुरात आणले. महिलेला अल्पवयीन मुलाला फूस लावल्याचा गुन्ह्यात अटक केली. तर सदर मुलाला आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.