पत्नीला सर्व सुखसुविधा मिळाव्यात म्हणून पती कामानिमित्त घराबाहेर, प्रियकर पत्नी जवळ घरी, एक दिवस डाव साधला अन् केला मोठा कांड!

Spread the love

पाली (राजस्थान) :- पती-पत्नीचे नाते हे सात जन्मांचे असते. सुख-दुःखात दोघांनीही एकमेकांची साथ द्यावी, अशी अपेक्षा असते. मात्र, याच नात्यातील विश्वास कुणी एका बाजूने तोडला, तर गुन्हा जन्म घेतो. राजस्थानमधील पाली येथे राहणाऱ्या कमलेशने आपल्या पत्नीला सर्व सुखसुविधा मिळाव्यात, यासाठी तो मेहनत घेत होता. सतत कामानिमित्त बाहेर राहणाऱ्या कमलेशला कल्पनाही नव्हती की, त्याच्या अनुपस्थितीत त्याचं नातं आतून पोखरलं जात आहे.

पती घराबाहेर, पत्नीनेच ठेवले परपुरुषाशी संबंध

कमलेश कामानिमित्त घराबाहेर असायचा, तेव्हा त्याची पत्नी सुकिया देवी हिचे त्याच्याच अकाउंटंट अशोक सीरवीसोबत विवाहबाह्य संबंध जुळले. कमलेशच्या अनुपस्थितीत अकाउंटंट घरी येत असे. मात्र, जेव्हा कमलेशला याची माहिती मिळाली, तेव्हा त्याने पत्नीला प्रश्न विचारले. या वादातून सुकियाने प्रियकराच्या मदतीने कमलेशची हत्या केली. नंतर दोघांनी मृतदेह पोत्यात भरून पुरला आणि फरार झाले. पण गुन्हा कितीही लपवला तरी तो उघडकीस येतोच. अखेर पोलिसांनी कमलेशचा मृतदेह शोधून काढला.

शेतात आढळला मृतदेह, पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

राजस्थानच्या सोजत येथील राष्ट्रीय महामार्गाजवळील शेतात पोलिसांना एक मृतदेह आढळला. एका मेंढपाळाने मातीखाली दबलेल्या बोटांचा काही भाग पाहून पोलिसांना माहिती दिली. मृतदेहाची ओळख पटवली असता तो पालीतील रहिवासी कमलेश कलाल याचा असल्याचे स्पष्ट झाले. तपासादरम्यान, ही हत्या त्याची पत्नी सुकिया देवी आणि अकाउंटंट अशोक सीरवी यांनी मिळून केल्याचे उघड झाले.

कमलेशच्या व्यवसायावर डोळा, कायम सोबत राहण्यासाठी खून

9 फेब्रुवारी रोजी सुकिया आणि अशोकने कमलेशची हत्या केली. त्यानंतर त्याच्या स्कुटीवरून दोघेही फरार झाले. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही पुण्यात असल्याचे समजले आणि त्यांना तिथून अटक करण्यात आले. चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, कमलेशच्या हत्येनंतर त्यांचा मार्ग मोकळा होईल आणि ते कायम एकत्र राहू शकतील, तसेच कमलेशचा व्यवसायही त्यांच्याच हातात राहील, म्हणून त्यांनी हा कट रचला. सध्या पोलिसांनी दोघांना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी