अवैधपणे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर सावदा पोलिसांच्या छापा, 60 किलो मांस जप्त, एक जणांवर गुन्हा दाखल

Spread the love

सावदा प्रतिनिधी (प्रशांत सरवदे) :- सावदा ता रावेर येथे अवैधपणे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर सावदा पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत बारा हजार रुपये किमतीचे 60 किलो मास जप्त करण्यात आले आहे. तसेच एकाला अटक करण्यात आली. सावदा येथून तीन किलोमीटर अंतरा जवळच असलेल्या वाघोदा बुद्रुक येथे आयशा मज्जित च्या बाजूला कत्तलखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती सावदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना मिळाली होती या आधारे शुक्रवारी पोलीस पथकाने छापा टाकला यात जनावरांचे मांस जप्त करण्यात आले, सोबत वजन काटा, मास कापण्यासाठीचा सुरा, रोख रुपये सुद्धा जप्त करण्यात आले आहेत.

दरम्यान याप्रकरणी शेख नईम शेख आयुब कुरेशी (वय 47) रा. रसलपुर ता. रावेर याला अटक करण्यात आली असून सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस विनोद पाटील हे करीत आहे. यावेळी सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी जनतेला आवाहन केले आहे की ज्या ठिकाणी गोवंश जातींच्या जनावरांची मास विक्री होत असेल त्याबाबत पोलीस ठाणे येथे माहिती द्यावी सदर ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

ज्या ठिकाणी कत्तलखाना चालू होता ती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ओपन स्पेस ची जागा असून या जागेवर कत्तलखाना उभारणेपर्यंत प्रशासनाचे दुर्लक्ष कसे झाले असा संतप्त सवाल गोरक्षकांनी व्यक्त केला आहे. व काही दिवसांपूर्वीच याच गावात गौवंश घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना गोरक्षक व पोलीस पाटलावर हल्ला झाला होता. तेव्हाच्या घटनेचा धागा या घटनेशी जोडला जातो का याचाही तपास पोलीस प्रशासनाने करावा अशी मागणी होत आहे. तर हे अनधिकृत कत्तलखाना तात्काळ जमीन दोस्त करण्यात यावा अशी ही मागणी गोरक्षकांनी यावेळी केली. विनोद पाटील, किरण पाटील, बबन तडवी, मनोज तडवी, नामदेव कापडे, संजीव चौधरी या पोलीस कर्मचाऱ्यांचा पथकात सहभाग होता

मुख्य संपादक संजय चौधरी