सत्कारासह निवडणुकीत केलेल्या सहकार्याची परतफेड “केमिस्ट भवन” साकारूनच करणार… एरंडोल येथे औषधी विक्रेता संघातर्फेआमदार अमोलदादा पाटील यांच्या सत्कार.

Spread the love

एरंडोल :- तालुका औषधी विक्रेता संघातर्फे आमदारपदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभाचे आयोजन जळगांव जिल्हा मेडीकल असोसिएशन अध्यक्ष सुनिलभाऊ भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या विधानसभा निवडणुकीत आपल्या सारख्या सुशिक्षित मंडळींनी सहकार्य म्हणजे आपण योग्य दिशेने जात असल्याचे निश्चित होते. दैनंदिन जीवनात वैद्यकीय क्षेत्र हे अत्यंत महत्वाचे आहे. गत काळात कोरोना महामारित आपण सर्वांनी खुप मोलाचे कार्य केले. तसेच विधानसभा निवडणुकीत देखील विकासाचा बाजुने खंबीरपणे उभे राहुन मला साथ दिली. आजच्या सत्कार व विधानसभा निवडणुकीत केलेले सहकार्य याची परतभेड म्हणुन लवकरच २० लक्ष रूपयांचे “केमिस्ट भवन” उभारणार असल्याचे यावेळी उपस्थित औषध विक्रेते बांधवांना ठोस आश्वासित केले.

प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख प्रा.मनोजभाऊ पाटील, जळगांव जिल्हा मेडीकल असोसिएशनचे केमिस्ट हृद्यसम्राट सुनिलभाऊ भंगाळे, अनिलभाऊ झवर, शामभाऊ वाणी, विलासदादा बर्डे, लखीचंद जैन, दिनेशभाऊ मालू,पारोळा नगरपरिषदेचे मा.नगरसेवक तथा मेजिल्हा संघटन सचिव मनिषकुमार पाटील, खजिनदार शामभाऊ येवले, एरंडोल तालुका मेडीकल असोसिएशनचे तालुकाध्यक्ष सतिष पाटील, पारोळा मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष शरद वाणी यांचेसह जळगांव जिल्हा, एरंडोल तालुका व पारोळा तालुका, कासोदा मेडीकल असोसिएशनचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, एरंडोलसह पंचक्रोशितील औषध विक्रेते उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यांनी घेतले परिश्रम

जिल्हा ec मेम्बर कैलास न्याती, एरंडोल ता. अध्यक्ष-सतीश पाटील,उपाध्यक्ष- सागर पाटील कासोदा,उपाध्यक्ष राजेंद्र हरी पाटील उत्राण, ता. सचिव-गुणवंत पाटील कासोदा, सहसचिव-मनोहर पाटील एरंडोल,सहसचिव ललित पाटील एरंडोल,संघटन सचिव-भूषण पाटील एरंडोल,पी.आर.ओ.- महेश पाटील एरंडोल, कोषाध्यक्ष-योगेश बियाणी. कार्यकारणी सदस्य. अमोल भक्कड एरंडोल, कमलेश चौधरी विखरण, संदीप पाटील एरंडोल, उदय पाटील एरंडोल,नाझीम बोहरी एरंडोल.प्रवीण शिरोळे एरंडोल,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील व अरविंद पाटील यांनी केले.

मुख्य संपादक संजय चौधरी