संजय गांधी नॅशनल पार्क परिसरातील रहिवाश्यांचा पुनर्वसनाच्या समस्या प्राधान्याने सोडविणार :-वने राज्यमंत्री नामदार श्री दत्तात्रय(मामा) भरणे

Spread the love

झुंजार ।प्रतिनिधी – संतोष कदम.
मुंबई :
संजय गांधी नॅशनल पार्क परिसरातील रहिवाश्यांच्या पुनर्वसनच्या समस्या प्राधान्याने सोडविणार असल्याची ग्वाही राज्यमंत्री नामदार श्री दत्तात्रय(मामा)भरणे यांनी दिली.
मंत्रालयातील दालनात संजय गांधी नॅशनल पार्क परिसरातील रहिवाश्यांच्या पुनर्वसनाच्या समस्याबाबत आयोजित बैठकीत वने राज्यमंत्री नामदार श्री दत्तात्रय(मामा)भरणे बोलत होते.यावेळी माजी आमदार विद्या चव्हाण वन विभागाचे प्रधानसचिव वेणुगोपाल रेड्डी, संजय गांधी नॅशनल पार्कचे प्रकल्प संचालक मल्लीकार्जुन, प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनिल लिमये तसेच संजय गांधी नॅशनल पार्क परिसरातील नागरिक यावेळी बैठकीला उपस्थित होते.
राज्यमंत्री नामदार श्री दत्तात्रय(मामा)भरणे म्हणाले, संजय गांधी नॅशनल पार्क परिसरातील रहिवाश्यांच्या पुनर्वसनाच्या समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.शौचालय,पाणी,वीज या मांडलेल्या समस्यांबाबत वन विभाग व रहिवाशी दोघांची बाजू ऐकून योग्य तो न्याय निर्णयासाठी सर्वोतोपरी सहकार्याची भूमिका राहील असे मत राज्यमंत्री नामदार श्री दत्तात्रय(मामा) भरणे यांनी बैठकीत व्यक्त केले.
माजी आमदार विद्या चव्हाण यांनी संजय गांधी नॅशनल पार्क परिसरातील रहिवाश्यांच्या समस्या बैठकीत मांडल्या.

टीम झुंजार