जळगाव तालुक्यातील धानवड येथे २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन संपवले जीवन,सासरच्या मंडळींना अटक करण्याची मागणी.

Spread the love

जळगाव :- तालुक्यातील धानवड येथे २२ वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास आत्महत्या केली. सोनी चेतन चव्हाण वय २२ असं मयत महिलेचं नाव आहे. दरम्यान पती आणि सासरच्या मंडळींच्या जांचाला कंटाळून महिलेनं आत्महत्या केल्याचा आरोप मयत विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येवून अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे.याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत असे की धानवड (ता. जळगाव) येथील सोनी चेतन चव्हाण (वय २२) ही विवाहिता पती आणि दोन मुलांसह राहत होती. सोमवारी (ता.१७) रात्री दहाच्या सुमारास सोनी चव्हाण यांनी घरात कुणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली.

घडला प्रकार उघडकीला आल्यानंतर विवाहितेच्या सासरच्या मंडळींनी तिला खाली उतरवून तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. वैद्यकीय अधिकारी डॉ. आश्विन देवचे यांनी तपासणीअंती सोनी चव्हाण यांना मृत घोषित केले.घडल्या प्रकाराची माहिती संबंधितांतर्फे मृत विवाहितेच्या माहेरी कळविण्यात आल्यानंतर माहेरच्या मंडळींनी जिल्‍हा रुग्णालयात धाव घेतली. आई-वडिलांनी मुलीचा मृतदेह बघताच हंबरडा फोडत आक्रोश केला.

पतीकडून छळ

साधारण ३ वर्षांपासून सोनी यांचा पती चेतन गजानन चव्हाण याला दारुचे व्यसन जडले असून, दारुच्या नशेत तो त्यांना रोजच मारहाण करीत होता. विनाकारण होणारी मारहाण, गांजपाट याला कंटाळून सोनीने यापूर्वी देखील विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.मात्र, आता घडलेली घटना ही आत्महत्या नसून गळा आवळून मारुन नंतर तिला लटकविण्यात आले, असा आरोप मृत विवाहितेची आई अनिता विनोद जाधव (रा.नांद्रा तांडा, सोयगाव) यांच्याकडून करण्यात आला आहे.

पतीसह सासरच्यांना अटक करा…’

आमच्या मुलीला ठार मारणाऱ्या तिच्या पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली. घडल्या प्रकाराबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत विवाहितेच्या मागे सार्थक (वय ३), प्रथमेश (वय ५) ही दोन आपत्ये आई, वडील, एक भाऊ, लहान बहिण असा परिवार आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी