.
एरंडोल – कोरोना आटोक्यात आल्यानंतर जवळपास सगळेच निर्बध हटवण्यात आले. कोरोनामुळे बंद करण्यात आलेले. महाविद्यालय, मंदिर, बाजार व इतर असे सगळेच पुन्हा सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा उत्साहा दिसून येतोय. एरंडोल येथील पद्मालय येथे अंगारिका चतुर्थीनिमित्त भाविकांमध्ये मोठा उत्साहा दिसून आला. अंगारिका चतुर्थीनिमित्त तब्बल 80 हजार भाविकांनी श्री.गणेशाचे दर्शन घेतले.
सकाळी जिल्हा वन अधिकारी विवेक होशिंग यांनी सपत्नीक अभिषेक केला. अमळनेरचे केशवराव पुराणीक यांनी अभिषेक पूजा केली. पहाटे ५ वाजे पासून मंदिर उघडण्यात आले. यावेळी संतोष पाथरवट यांचे स्मरणार्थ भाविकांसाठी ज्ञानेश्वर पाथरवट हनुमंत खेडे सिम यांनी थंड पाणी व लिंबू सरबत ची व्यवस्था केली. तसेच पु.ना.गाडगीळ आणि सन्स व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे देखील थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली. रिंगण गाव पी.एच.सी., कासोदा, तळई, रिंगणगाव पी.एच.सी चे स्टाफ तसेच डॉ.पी.जी. पिंगळे कासोदा व डॉ. कोल्हे नाशिक यांनी मोफत रुग्णसेवा केली. सदर रुग्णसेवा ३१ वर्षापासून सुरू आहे.
यावेळी एरंडोल पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव व सहाय्यक पोलीस निरीक्षक बागल यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. तसेच एरंडोल तहसीलदार सुनिता चव्हाण यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
यावेळी एसटी महामंडळा तर्फे सुरळीत बस सेवा, एरंडोल नगर पालिकेतर्फे अग्निशमनदल, विज वितरण कंपनीतर्फे सुनियोजित नियोजन करण्यात आले. याप्रसंगी संपूर्ण विश्वस्त मंडळ व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.