श्रीगंगानगर : – नवरा-बायकोनं घरात एकत्र राहण्यात काहीच गैर नाही, परंतु एक कपल त्यांच्या घरात जे खतरनाक काम करायचे त्याबाबत कळताच संपूर्ण परिसर हादरला. अगदी पोलीसही हैराण झाले. आता पोलिसांकडून या नवरा-बायकोचा आका कोण याबाबत झाडून तपास सुरू आहे.नवरा-बायको एकत्र संसार करतात, एकमेकांवर भरभरून प्रेम करतात, वेळ आली की दुश्मनांसारखं भांडतात. परंतु या नवरा-बायकोनं जे केलं त्याचा तुम्ही, आम्ही सर्वसामान्य माणसं अंदाजही लावू शकत नाही. खरंतर ते एवढ्या सफाईदारपणे कांड करत होते की, त्यांच्या शेजाऱ्यांनाही कानोकान खबर लागली नाही.
आता पोलिसांनी दोघांच्याही मुसक्या चांगल्याच आवळल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या नवरा-बायकोला अटक केलीच, शिवाय दोघांकडून ड्रग्स, हत्यारं आणि लाखो रुपयेही जप्त केले. हे दोघं कधीपासून हे काम करताहेत आणि त्यांच्या डोक्यावर नेमका कुणाचा हात आहे, याबाबत पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.राजस्थान राज्यातील श्रीगंगानगर जिल्ह्यातून ही घटना समोर आली. पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की, जिल्ह्यात ड्रग्सविरोधी अभियान राबवलं जातंय. याअंतर्गत सदर नवरा-बायकोबाबत माहिती मिळाली.
रायसिंहनगर पोलिसांनी तपास करून शनिवारी त्यांच्या घरावर छापा टाकला. दारात पोलिसांना पाहून नवरा-बायकोच्या चेहऱ्यावरचे रंग पार उडाले. त्यांना अक्षरशः पळता भुई थोडी झाली. नवरा-बायको एवढ्या गुप्त पद्धतीनं ड्रग्स तस्करी करायचे की, अजिबात कोणालाही याची कल्पना नव्हती. नवऱ्याविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये 3 प्रकरणं दाखल होती. तीनही प्रकरणांमध्ये त्याला अटक झाली नव्हती. परंतु आता मात्र पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्याच.






