पारोळा:- शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा ना एकनाथराव शिंदे साहेब यांच्याबद्दल कुणाल कामरान याने गायनातुन वादग्रस्त विधान केल्याने त्यांचावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी यासाठी पारोळा एरंडोल मतदारसंघाचे मा आमदार आबासाहेब चिमणराव पाटील यांचा मार्गदर्शनाखाली व पारोळा एरंडोल मतदारसंघाचे आमदार मा अमोलदादा पाटील यांचा आदेशाने पारोळा पोलीस निरीक्षक मा सुनील पवार साहेब यांना निवेदन देण्यात आले
निवेदन देतेवेळी तालुकाप्रमुख मधुकर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा उपसभापती प्रेमानंद पाटील, शिवसेना मंगरूळ गटप्रमुख भैय्यासाहेब पाटील ,शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख समाधान मगर, वाघरे सरपंच रावसाहेब पाटील, हनुमंतखेडे सरपंच लक्ष्मण पाटील, उदीरखेडे ग्रा प सदस्य अक्षय निकम, आर टी यो एजट योगेश पाटील, उपशहरप्रमुख नितीन बारी, शिरसमणी मा उपसरपंच चेतन पाटील, बोळे येथील महेंद्रसिंग राणावत, विकी राणावत,भोंडण येथील विजय पाटील, भोकरबारी गणेश पाटील, टिटवी येथील विलास मगर आदी उपस्थित होते