पारोळा तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांने त्याचाच अल्पवयीन मुजराचा घेतला बळी.

Spread the love


पारोळा :- तालुक्यातील शिरसोदे येथे बोरी नदीपात्रात अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर हा नदीमध्ये रिव्हर्स घेत असताना त्याचा वाळू भरण्यासाठी आलेला मजुराला धक्का लागल्यान तो अल्पवयीने मजूर हा जागीच ठार झाल्याची घटना पहाटे तीन वाजता घडली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात चालक व मालकावर गुन्ह्यांची नोंद करण्यात आले असून चालकाला अटक करण्यात आलेली आहे.

अवैद्य वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांने हा अवघ्या पंधरा वर्षे वयचा अल्पवयीन तरुण मजुराचा बळी घेतल्याने तालुक्यातून संताप व्यक्त केला जात आहे.
पारोळा शहरात भडगाव येथील गिरणा नदी व तालुक्यात बोरी नदीपत्रातून मोठ्या प्रमाणात सरास अवैध वाळू वाहतूक ही दिवस रात्र प्रशासनाच्या डोळ्यासमोर सुरू आहे. त्यावर कारवाई करण्याकडे तर महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाने कमालीचे दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे अवैध वाळू वाहतूक हे तालुक्यात मोठ्या प्रमाणात बोकडलेली आहे.

शिरसोदे तालुका पारोळा येथील बोरी नदी पात्रात पाहाटे तीन वाजेच्या सुमारास अवैद्य वाळू भरण्यासाठी गेलेले ट्रॅक्टर क्रमांक MH 19 CY 1236 याला जोडलेली ट्रॉली मागे घेत असताना वाळू भरण्यासाठी आणलेला मजूर देवा उर्फ गौतम गोकुळ भिल वय 15 यास ट्रॉलीचे जोरदार धडक लागली. त्यात गौतम याचे डोक्याचे रक्त निघाल्याने तो गंभीरित्या जखमी झाला. या घटनेची माहिती चालक अजय भिल्ल याने जखमीचा भाऊ राहुल गोकुळ भिल याला घटनेची माहिती दिली. राहुल याने घटनास्थळी जाऊन बघितले असता त्याचा भाऊ हा मयत स्थितीत रुग्णवाहिकेत दिसून आला त्याला बहादरपुर सरकारी दवाखान्यात घेऊन गेले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मृत घोषित केले आहे.

याबाबत राहुल भिल्ल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक अजय देवमन भिल , व ट्रॅक्टर मालक समाधान शंकर पाटील रा शिरसोदे तालुका पारोळा या दोघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टर चालक अजय भिल याला वाहनासह पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. अवैद्य रेती वाहतूकीने अल्पवयीन तरुणाचा बळी घेतल्याने या परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान राजरोसपणे सुरू असलेली आवैद्य वाळू वाहतुकीकडे महसूल प्रशासन पोलीस प्रशासन यांन ठरवुन दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली आहे. वरिष्ठांनी याबाबत दखल घेऊन ही अवैद्य वाळू वाहतूक तालुक्यातून बंद करावी अशी एक मुखी मागणी परिसरातून होत आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी