आमदार अमोलदादा पाटील यांची महाराष्ट्र विधानसभेच्या नियम समिती व आश्वासन समितीच्या सदस्यपदी निवड..

Spread the love


पारोळा : – महाराष्ट्र विधानसभा 2024-25 या वर्षासाठी विधानमंडळाच्या विविध समित्यांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर सरकारने विधिमंडळाच्या महत्त्वाच्या समित्यांचे प्रमुख जाहीर केले असून, यामध्ये एरंडोल विधानसभेचे आमदार अमोलदादा पाटील यांची नियम समिती (विधानसभा नियम २२४) आणि आश्वासन (विधानसभा नियम २२७) समितीवर निवड करण्यात आली. ही नियुक्ती महाराष्ट्र विधानसभेचे माननीय अध्यक्ष यांनी दिनांक 26 मार्च 2025 रोजी जाहीर केली . या निवडीमुळे आमदार अमोलदादा पाटील यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नियम समिती आणि आश्वासन समिती महत्त्वाची जबाबदारी
महाराष्ट्र विधानसभेच्या नियम समिती आणि आश्वासन समित्या या सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवणाऱ्या आणि जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत आहे की नाही, याची खातरजमा करणाऱ्या महत्त्वाच्या समित्या आहेत. विधानसभा नियम समितीत ११ सदस्यांचा समावेश असून मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा हे पदसिध्द समिती प्रमुख असतात.

सभागृहातील कामकाजाची पध्दती व ते चालविण्याची रीती यांचे नियमन करण्यासाठी असलेल्या नियमांचा विचार करुन त्यात आवश्यक वाटतील अशा सुधारणा तसेच सदस्यांनीही सुचविलेल्या सुधारणा यांचा विचार करुन नियमात बदल सुचविणे, हे या समितीचे काम आहे. असते तर आश्वासन समिती सरकारने विधानसभेत दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होते की नाही, याचा आढावा घेते. या दोन्ही समित्यांवर आमदार अमोलदादा पाटील यांची नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी