इन्स्टाग्रामवर दोघांच्या ओळखीचं रुपांतर घट्ट मैत्रीत दोघं कधीही भेटले नाही, कधीही शारीरिक संबंध नाही तरी पण तरुणी सांगते मी गर्भवती, तरुणाने उचललं टोकाचं पाऊल.

Spread the love

मुंबई :- जोगेश्वरी परिसरात एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका तरुणाने इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणीच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे. तरुणाने स्वत:च्या गळ्यावरून चाकू फिरवत आत्महत्या केली आहे. इन्स्टाग्रामवर ओळख झालेली तरुणी कधीही मयत तरुणाला कधीही भेटायला आली नव्हती. त्याच्यासोबत फिरायला गेली नव्हती, तरीही तरुणीने आपण प्रेग्नंट असल्याचं सांगत तरुणाला ब्लॅकमेल केलं.तरुणीच्या छळाला कंटाळून अखेर तरुणाने आयुष्याचा शेवट केला आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेचा पुढील तपास जोगेश्वरी पोलीस करत आहेत.सचिन मेघजी गाला असं आत्महत्या करणाऱ्या २८ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो मुंबईतील जोगेश्वरी परिसरात राहत होता. काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर त्याची ओळख मुस्कान नावाच्या तरुणीसोबत झाली होती. दोघांमध्ये बऱ्याच गप्पा व्हायच्या. पुढे या ओळखीचं रुपांतर घट्ट मैत्रीत झालं. दोघंही सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात होते. दोघांमध्ये कधीही शारीरिक संबंध आले नव्हते. शिवाय दोघं एकत्रित कुठे फिरायलाही गेले नव्हते.तरीही मुस्कान गर्भवती असल्याचं सांगून तरुणाला ब्लॅकमेल करत होती. मागील काही दिवसांपासून मुस्कान सचिनचा मानसिक छळ करत होती.

या छळाला कंटाळून अखेर तरुणाने राहत्या घरात गळ्यावरून चाकू फिरवून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत त्याला गंभीर दुखापत झाली. या धक्कादायक प्रकारानंतर सचिनला आधी कोकीलाबेन आणि नंतर सेव्हन हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोन्ही ठिकाणी उपचार घेऊनही त्याचा जीव वाचला नाही. उपचारादरम्यान ४ मार्चला सचिनचा मृत्यू झाला. याप्रकरणी आता जोगेश्वरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

मुख्य संपादक संजय चौधरी