Viral Video:- लखनऊच्या रस्त्यावर एक विचित्र घटना घडली आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला रस्त्याच्या मधोमध बसलेली दिसत असून तब्बल २० ते ३० मिनिटे विचित्र हरकती करताना दिसली.या घटनेमुळे स्थानिक नागरिक तसेच वाहतूक पोलिसही मोठ्या प्रमाणात हैराण झाले.
काय घडले व्हिडिओत?…..
व्हायरल व्हिडिओ हा लखनौचा असल्याचे समजत आहे. यात एक महिला रस्त्याच्या मधोमध आपला नको ते विचित्र प्रकार करताना दिसून आली. व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता यात एक महिला रस्त्याच्या मधोमध बसून केस मोकळे करून आपले डोके गरागरा फिरवत आहे. सुरवातीला आजूबाजूचे तिच्याकडे दुर्लक्ष करतात मात्र पुढे तिचा हा ड्रामा आणखीनच वाढू लागतो ज्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागते.
सर्व गाड्या थांबतात आणि महिलेचा विचित्र प्रकार बघू लागतात.या घटनेचा व्हिडिओ अनेकांनी आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केला. ही घटना आता सोशल मीडियावर एक चर्चेचा विषय बनली आहे. व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे, काही लोकांनी महिलेला तेथून जाण्यास सांगितले मात्र तिने कुणाचेही काही ऐकले नाही. व्हिडिओतील दृश्ये पाहून आता अनेकजण याची मजा लुटत आहेत तर काहीजण महिलेचे मानसिक संतुलन बिघडल्याचे म्हणत आहेत.
वाहतूक कोंडी आणि गोंधळ…..
रस्त्याच्या मधोमध बसलेल्या महिलेच्या या वागण्यामुळे संपूर्ण रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. काही नागरिक महिलेला तेथून जाण्यास सांगत होते, मात्र ती काहीही ऐकत नसल्याचे व्हिडिओत दिसते. सध्या हा व्हायरल व्हिडिओ @ForMenIndia_ नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आता आहे. हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी कमेंट्समध्ये या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मानसिकता ठीक नाही……गरीब बाई” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भूत किंवा चुडैल नाही. हे फक्त मानसिक कृत्य आहे”.टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.
https://x.com/ForMenIndia_/status/1902780318844850465?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1902780318844850465%7Ctwgr%5Efa8b0a8c30aa0befa82a46ae3ed469a56f419cf8%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F