एरंडोल MIDC मंजुरीच्या दिशेने एक पाऊल पुढे…… अंतिम प्रस्तावा संदर्भात महत्वपूर्ण बैठक संपन्न…… आमदार अमोलदादा पाटील यांची माहिती…..

Spread the love

एरंडोल : – एरंडोल विधानसभा मतदारसंघातील एरंडोल हे मोठ्या लोकसंख्येचे शहर असून एरंडोल ही मोठी बाजारपेठ म्हणून सर्वत्र परिचित आहे. तसेच एरंडोल शहर राष्ट्रीय महामार्गावर असल्याने या ठिकाणी लहान मोठ्या उद्योगांना चालना मिळणार असल्याने या ठिकाणी नवीन एमआयडीसी होण्यासाठी स्थानिक नागरिक, व्यापारी, लहान-मोठे उद्योगी यांच्याकडून मागणी होत होती. या संदर्भात कार्यवाही करण्याबाबत मा.आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील हे सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न करीत होते.

गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर या प्रस्तावाच्या उर्वरित बाबी लवकरच पूर्ण करून प्रस्ताव तातडीने शासन दरबारी सादर करण्याचा सूचना देखील आमदार अमोलदादा पाटील यांनी संबंधित विभागाला केल्या होत्या. या अंतिम प्रस्तावावर आज राज्याचे उद्योगमंत्री मा.ना.श्री.उदयजी सामंत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार अमोलदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील मंत्रालयीन दालनात राज्याचा उद्योग विभागाचे मा.सचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सह मुख्य कार्यकारी अधिकारी, व्हि.सी.व्दारे जळगांव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सहसचिव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, भुसंपादन विभागाचे महाव्यवस्थापक, एरंडोल उपविभागीय अधिकारी मनिषकुमार गायकवाड, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे जळगांव येथील प्रादेशिक अधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांसमवेत महत्वपूर्ण बैठक पार पडली.

एरंडोल शहर हे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर असल्याने येथील बाजारपेठ हि मोठी आहे. सध्या नवयुवकांना नोकऱ्या नसल्याने बरेचशे युवक हे व्यवसायाकडे वळत आहेत. तसेच बचत गट व इतर संस्था ह्या लहान-मोठ्या व्यवसायातून रोजगार निर्मिती करीत असतात. नियोजित एरंडोल, जि. जळगांव औद्योगिक क्षेत्रामुळे या सर्वांचा आपल्या लहान मोठ्या व्यवसायाला चालना मिळण्यासाठी मोठी मदत होणार आहे. तसेच बेरोजगारी देखील काही प्रमाणात कमी होण्यासाठी मदत होणार आहे. या बैठकीत मतदारसंघात MIDC मंजुर होवुन कार्यान्वित झाल्यास लहान-मोठे उद्योग व्यवसायासह इतर गोष्टींना कसा फायदा होईल याबाबतची पार्श्वभूमी आमदार मा.अमोलदादा पाटील यांनी उद्योगमंत्री महोदयांचा लक्षात आणुन दिली. याची दखल घेत तातडीने या ठिकाणाची स्थळ पाहणी करण्याचे आदेश मा.मंत्री महोदयांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. तसेच या MIDC च्या मंजुरीसाठी इतर आवश्यक त्या विषयांवर सकारात्मक बैठक पार पडली.

मुख्य संपादक संजय चौधरी