एरंडोल येथे शिवसेना गांधीपुरा शहरप्रमुखावर किरकोळ कारणावरून प्राणघातक हल्ला.

Spread the love

एक संशयित आरोपीस अटक,दोन संशयित फरार, अटक केलेल्या आरोपीस तीन दिवसाची पोलिस कोठडी.

एरंडोल :- नातीची सायकल का फेकली याचा जाब विचारल्याच्या किरकोळ कारणावरून युवकावर धारदार शस्त्राने वार करून प्राणघातक हल्ला केल्याच्गी घटना काल (ता.२) रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. संशयिताने केलेल्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याचेवर जळगाव येथे खासगी रुग्णालयात उपचारसुरु आहेत.याबाबत माहिती अशी,की गांधीपुरा भागातील रहिवासी माजी नगरसेवक सुभाष सोनू मराठे यांनी मंगळवारी रात्री त्यांच्या नातींच्या सायकली राहत्या घराच्या ओट्यावर लावल्या होत्या.

त्याचवेळी गल्लीत राहणारे करण उर्फ विजय ज्ञानेश्वर केदार,सनी संदानशिव, लकी संदानशिव या तिघांमध्ये वाद सुरु झाला.तिघांमध्ये भांडण सुरु असतांना त्यांनी सुभाष मराठे यांच्या ओट्यावर लावलेल्या सायकली फेकून दिल्या.सायकली फेकल्यानंतर देखील सुभाष मराठे तिघाही तरुणांना काहीही बोलले नाहीत.बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास सुभाष मराठे व त्यांचा मुलगा अतुल मराठे यांनी काल तुम्ही सायकली का फेकल्या असे विचारले असता तिघाही संशयितांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.शिवीगाळ करून वाद घालत असतांनाच संशयित लकी संदानशिव याने त्याचेजवळ असलेल्या धारदार शस्त्राने अतुल मराठे याच्या पाठीवर आणि हातावर दोन वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये अतुल मराठे गंभीर जखमी झाला.सुभास मराठे यांनी आरडाओरड केल्यामुळे गल्लीतील उल्हास लोहार, हर्शल पाटील, अंकुश मराठे,हर्शल वंजारी घटनास्थळी आले आणि त्यांनी गंभीर जखमी झालेल्या अतुल मराठे यास पद्मालय हॉस्पिटल येथे नेले. पद्मालय हॉस्पिटलमध्ये प्रातःमिक उपचार केल्यानंतर त्यास जळगाव येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याबाबत सुभाष मराठे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिघाही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत.हल्ल्यात जखमी झालेले अतुल मराठे शिवसेनेच्या गांधीपुरा विभागाचे शहरप्रमुख आहेत.

दरम्यान शहरात गुंडगिरीच्या प्रमाणात वाढ झाली असून पोलिसांचा कोणताही धाक गुंडांवर राहिला नसल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.शहरातील काही युवक गुंडगिरी करून दहशत निर्माण करत असतांना पोलीस प्रशासनाने मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल आच्छर्य व्यक्त केले जात आहे.दरम्यान संशयित आरोपी करण उर्फ विजय ज्ञानेश्वर केदार यास न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश यांनी तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी