कुशलनगर(कर्नाटक):- कधी-कधी प्रत्यक्ष आयुष्यातील घटना देखील एखाद्या चित्रपटाच्या रहस्यमय पटकथेला लाजवणाऱ्या असतात. एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीवर अंत्यसंस्कार केले.काही वर्षांनी पोलिसांनी त्यानं पत्नीची हत्या केली असता आरोप ठेवून त्याला अटक केली. त्या आरोपात त्यानं तुरुंगवास भोगला. तो त्यानंतर गावी परतला आणि त्याला धक्काच बसला. त्याची बायको जिवंत होती. इतकंच नाही तर तिच्या बॉयफ्रेंडसोत हातामध्ये हात घालून बिनधास्त फिरत होती.
काय आहे प्रकरण?….
ही कहाणी कर्नाटकातील कोडगु जिल्ह्यातील कुशलनगर तालुक्यातील बसवनहल्ली गावात घडली आहे. जिथे स्थानिक रहिवासी सुरेश एकेकाळी त्याची पत्नी मल्लिगेसोबत शांत जीवन जगत होता. 2019 मध्ये ती अचानक गायब झाली आणि तिचा काहीच पत्ता लागला नाही.नेमकं काय झालंय हे जाणून घेण्यासाठी हताश असलेल्या सुरेशने कुटुंबीयांच्या मदतीने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्याला तिच्या कथित विवाहबाह्य संबंधांची कुजबुज ऐकू आली. दुःखी असूनही, त्याने मल्लिगेला फोन केला आणि तिच्या मुलांसाठी किमान संपर्कात राहण्याची विनंती केली. पण तिने कधीही प्रतिसाद दिला नाही. आपल्याला या प्रकरणात अडकवलं जाऊ शकतं या भितीपोटी त्याने 2021 मध्ये कुशलनगर पोलिसांशी संपर्क साधला आणि बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पण नियतीने त्याच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं.
पत्नीच्या हत्येच्या आरोपात अटक…..
2022 साली सुरेशला पोलिसांनी बोलावलं. त्याची पत्नी मल्लिगेच्या अस्थी सापडल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर सुरेशनं त्याच्या सासूसोबत पत्नीवर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर काही दिवसांनी पोलिसांनी पत्नीच्या हत्येखाली त्याला अटक केली. सुरेशनं सर्व आरोप फेटालले. पण, त्याचा उपयोग झाला नाही. पोलिसांनी त्याची रवानगी तुरुंगात केली..
सांगाडा, अंत्यसंस्कार आणि खोटे आरोप….
2022 मध्ये पोलिसांनी सुरेशला बोलावून सांगितलं की त्याच्या पत्नीच्या मृतदेहाचे अवशेष पेरियापटना तालुक्यातील बेट्टाडापुरा जवळ सापडले आहेत. त्याच्या सासूसोबत त्याला एक सांगाडा पाहण्यासाठी नेण्यात आलं आणि ती त्याची पत्नी असल्याचं सांगण्यात आले. यानंतर त्याने तिच्यावर अंत्यसंस्कार केले.यानंतर पोलिसांनी सुरेशवर त्याच्या पत्नीचा खून केल्याचा आरोप केला. तो वारंवार नकार देत असतानाही त्याला अटक करण्यात आली आणि तुरुंगात टाकण्यात आलं.
सांगाड्याच्या अवशेषांच्या फॉरेन्सिक डीएनए अहवालात मल्लिगेच्या कुटुंबाशी अनुवांशिक जुळणी नसल्याचं आढळून आले तेव्हाच सुरेशला दोषमुक्त करण्यात आले आणि तुरुंगातून सोडण्यात आलं.यानंतर 1 एप्रिल 2025 रोजी, सुरेशला आणखी एक धक्का बसला. त्याच्या मित्रांनी मल्लिगेला मदिकेरी येथील एका हॉटेलमध्ये चेक इन करताना पाहिलं, ती जिवंत, निरोगी आणि तिच्या प्रियकरासह होती. धक्का बसला, त्यांनी फोटो काढले आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पोलिसांनी तातडीने महिलेला ताब्यात घेतले आणि म्हैसूर येथील न्यायालयात हजर केलं.