दोन महिन्या भरापूर्वीच झाले लग्न,नवदाम्पत्यानं अचानक उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल; कुटुंबीय देखील हादरले

Spread the love

बीड :- जिल्ह्यात दररोज धक्कादायक घटना घडत आहेत. कधी हत्या तर, कधी अपहरण. या घटनांमुळे बीड गुन्हेगारांचे हॉटस्पॉट बनले आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच बीडमधून आणखी एक हादरवणारी घटना समोर येत आहे.एका नवविवाहित दाम्पत्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. २ महिनाभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. मात्र, अचानक दोघांनीही आयुष्य संपवल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आधी बायको नंतर नवऱ्याने आयुष्य संपवलं…..

बीडच्या केतुरा येथे एका नवविवाहित जोडप्याने आत्महत्या केली आहे. शुभांगी अक्षय गालफाडे या नवविवाहित तरूणीने २ मार्चला दुपारी तीन वाजताच्या दरम्यान, राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. तर, दुसऱ्या दिवशी पती अक्षय गालफाडे याने देखील पहाटे पाचच्या दरम्यान, लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे.

२ महिन्यांपूर्वीच लग्न…..

या जोडप्याचे २ महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर हे जोडपं पुण्यात राहायला गेले होते. मात्र, काही दिवसानंतर त्यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता. वाद झाल्यानंतर हे जोडपे पुन्हा आपल्या मुळगावी केतुरा येथे परतले. केतुरा परतल्यानंतर पुन्हा त्यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला. त्यानंतर तरूणीने आधी आयुष्य संपवण्याचे ठरवले आणि नंतर तरूणानेही गळफास घेत आत्महत्या केली.

पोलिसांचा तपास सुरू…..

या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रूग्णालयात पाठवले आहे.त्याच्या आत्महत्येची बातमी ज्यावेळी कुटुंबियांनी कळली, त्यावेळी त्याच्या आईने मोठा हंबरडा फोडला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

तरूणाने आत्महत्या का केली?……

शुभांगीचा मृत्यू झाल्यानंतर अक्षय गालफाडे यांना पत्नीच्या कुटुंबाने त्याला धारेवर धरलं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने गावातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणात दोघांनी आत्महत्या का केली? याचा शोध सुरू असून, घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी