घरच्या वाटणीत जास्त हिस्सा मागतो म्हणून पोटच्या मुलाचा केला खुन;अन् अपघाताचा केला बनाव, एक तासाच्या आत भडगांव पोलिसांन कडुन अपघाताचा बनाव उघड.

Spread the love

संशयित आरोपी पिता व पुत्रास भडगांव न्यायालयात हजर केले असता ४ दिवसाची पोलीस कोठडी.

भडगांव प्रतिनिधी : – तालुक्यातील बाळद खु. ता.भडगांव येथे दि. ८ रोजी रात्री ९ः ४५ वाजे दरम्यान घराच्या वाटणीत जास्त हिस्सा मागतो म्हणून पोटच्या मुलाचा खुन करून पिता पुत्रांनी अपघाताचा बनाव केला होता या घटने प्रकरणी संशयित आरोपी पिता पुत्रांना पोलिसांनी विश्वा सात घेत आरोपी यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. याबाबत सशंयित आरोपी यांना अटक करून भडगांव न्यायालयात हजर केले असता ४ दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की दिनांक ०८/०४/२०२५ रोजी २१.४५ वाजेच्या सुमारास बाळद खु.ता.भडगांव जि. जळगांव गांवी मयत नामे बाळु राजेंद्र शिंदे (नाईक), वय २६ वर्ष, रा.बाळद खुर्द, ता. भडगाव जि. जळगाव हा मयत झाले असले बाबत पोलीस पाटील बाळद खु. ता. भडगाव यांना समजुन आल्याने त्यांनी लागलीच पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना सदर घटनेबाबत कळवुन लागलीच पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार हे सदर घटनास्थळी पोहचुन घटनास्थळाची व प्रेताची बारकाईने पाहणी करता मयताचे चेहऱ्यावर व छातीवर मारहाण झाल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसुन आले.

त्यानंतर सदर प्रेत हे पुढील कारवाई साठी ग्रामीण रुग्णालय, भडगाव येथे पाठविण्यात आले. सदर घटनास्थळाचे व मयत याचे प्रेताची बारकाईने पाहणी करता पोलीस निरीक्षक श्री पांडुरंग पवार यांना घातपात झाल्याचा संशय आल्याने मा. पोलीस अधिक्षक माहेश्वर रेड्डी सो, जळगाव, मा. अपर पोलीस अधिक्षक सौ कविता नेरकर चाळीसगाव परिमंडळ, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजेशसिंह चंदेल सो, चाळीसगांव भाग यांचे सुचना व मार्गदर्शना नुसार सदर मयता बाबत तपास करीत असतांना मयत प्रथम मयताचे नातेवाईकांनी अपघाताच्या बनाव केला. मयताचे वडील राजेंद्र रामचंद्र शिंदे व मयताचा भाऊ भारत राजेंद्र शिंदे अशांना पुढील चौकशीकामी पोलीस स्टेशनला बोलवले.

मयताचे वडील राजेंद्र शिंदे व त्याचा भाऊ भारत शिंदे यांनी मयत हा घरावरुन खाली पडल्याने मरण पावला असे सांगितले. त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की, मयत बाळु राजेंद्र शिंदे हा नेहमी घराच्या वाटणीत जास्त हिस्सा आमच्या कडे मागत असे व आमच्या सोबत वाद घालत असे त्यामुळे आम्ही दिनांक ०८/०४/२०२५ रोजी रात्री ०९.४५ वा. सुमारास घरात वाटणीचा जास्त हिस्सा मागतो या कारणावरुन त्यास आमचे घराजवळच धक्काबुक्की करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ करुन हातात लाकडी दांडके घेवुन मयत बाळु राजेंद्र शिंदे (नाईक) यास चेह-यावर व छातीवर मारहाण करुन त्यास जिवे ठार मारले आहे आहे असे सांगीतल्याने याबाबत मयताचे कोणीही नातेवाईक तक्रार देण्यासाठी तयार नसल्याने बाळद खु. ता. भडगाव गावाचे पोलीस पाटील सुनिल लोटन पाटील वय ५४ धंदा- शेती व पोलीस पाटील, रा. बाऴद खु. ता भडगांव यांची फिर्याद घेवुन भडगाव पो.स्टे. १२३ / २०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०३(१)११५ (२), ३५२,३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यातील आरोपी नामे १) भारत राजेंद्र शिंदे, वय २२ वर्ष, २) राजेंद्र रामचंद्र शिंदे, वय ४८ वर्ष, दोन्ही रा. बाळद खु ता. भडगांव जि.जळगांव अशांना दिनांक ०९/०४/२०२५ रोजी ०५.२० वाजता अटक करण्यात आली असुन मा.न्यायालयाने त्यांना ०४ दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी मजकुर यांचा अपघाताचा बनाव उघड करुन ०१ तासात आरोपी निष्पन्न करण्यात आले.

सदरची कामगिरी

मा. पोलीस अधिक्षक श्री माहेश्वर रेड्डी सो, जळगाव, मा. अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर सो, चाळीसगाव परिमंडळ,
मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजेशसिंह चंदेल सो, चाळीसगांव भाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री पांडुरंग पवार, सहायक पोलीस निरीक्षक श्री गणेश म्हस्के, पो.उपनिरी. सुशील सोनवणे, पोहे कॉ मुकुंद परदेशी, पोहे काँ नरेंद्र विसपुते, पोहे काँ निलेश ब्राम्हणकार, पोना मनोज माळी, पोकाँ महेंद्र चव्हाण, पोकाँ दत्ता पाटील, पोकाँ संदिप सोनवणे, पोकाँ सुनिल राजपुत, पोकाँ प्रविण परदेशी, पोकाँ संभाजी पाटील (चालक) यांनी केली असुन गुन्हाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्री गणेश म्हस्के करीत आहेत.

मुख्य संपादक संजय चौधरी