Viral Video:रेल्वेत प्रवाशांच्या मोबाईल चोरण्याच्या प्रयत्नात चोराच्या हात अडकला खिडकीत,चोर एक किलोमीटरपर्यंत गेला लटकत पहा थरारक व्हिडिओ.

Spread the love

Viral Video: रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोराची चांगलीच गोची झाली आहे. चोराने खिडकीतून हात घालून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला, पण चोराचा अंदाज चुकला आणि त्याला आपला जीव गमावण्याची वेळ आली.हा सर्व थरारक प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला असून सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला आहे.

फोन हिसकावण्याचा प्रयत्न अंगलट…..

घडले असे की, एक प्रवासी रेल्वेच्या खिडकीत बसून मोबाईवर बोलत असतो. तेवढ्यात प्लॅटफॉर्मवर असलेला चोर धावत येतो आणि खिडकीतून मोबाईल (Mobile) हिसकावण्याचा प्रयत्न करतो. परंतू, त्या प्रवाशाने आपला मोबाईल घट्ट पडला त्यामुळे चोराचा हात चक्क खिडकीतच अडकला आणि ट्रेनही सुरु झाली.

चोर ट्रेनसोबत एक किलोमीटर ओढला गेला!….

व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, चोराला प्रवाशांनी पकडल्यामुळे त्याचे संपूर्ण शरीर ट्रेनला लटकत गेले. चोरीच्या या प्रयत्नामुळे चोर सुमारे एक किलोमीटरपर्यंत ट्रेनला लटकत राहिला. संपूर्ण घटना एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केली आहे आणि सोशल मीडियावरही शेअर करण्यात आली आहे.@BimaruKumari या एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ (Video) शेअर करण्यात आलेला आहे. संपूर्ण घटना बिहार येथील असल्याचे समजते. मात्र, याची पुष्टी अद्याप झालेली नाही. घटना पाहून अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,”अशा सोबत असंच केलं पाहिजे” तर अशा अनेक यूजर्संनी संतापजनक तर मजेशीरही प्रतिक्रिया केलेल्या आहेत.टीप: चोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

मुख्य संपादक संजय चौधरी