धक्कादायक! पोलिस उपनिरीक्षकच चालवायचा चोरीचे रॅकेट? चोपडा बसस्थानकावर शेतकऱ्याला लुटणारे चौघे पोलिसांच्या जाळ्यात.

Spread the love

चोपडा :- येथील बसस्थानकावर एका शेतकऱ्याचे ३५ हजार रूपये घेवून पळणाऱ्या चार चोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून यात धक्कादायक म्हणजेच या चोरांमध्ये जालना येथील पोलिस उपनिरीक्षकचा समावेश असल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली आहे.प्रल्हाद पिरोजी मान्टे (वय ५७) असं या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून राज्यभरातील बसस्थानकावर चोरीचे रॅकेट चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे.दरम्यान, प्रल्हाद मान्टे याने चोरी केल्याची कबुली दिली.

नेमकी घटना काय?…..

बुधवारी चोपडा बसस्थानकावर दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास वाळकी गावचे शेतकरी वसंत उखा कोळी यांचे ३५ हजार रूपये बसस्थानकातून चोरी झाले. पोलिसांना चोपड्यात चोरी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी पाळत ठेवून चोरांनी वापरलेल्या इंडिगो कार (क्र एम एच-४३ एन-२९२८ व) या कारचा पाठलाग केला.

अटक करण्यात आलेल्या चोरांचे नाव…..

चोपडा-धरणगाव रस्त्यावर त्यांनी कारसह चोरांना अटक केली. त्यात जालना येथील उपनिरीक्षक प्रल्हाद पिराजी मान्टे (वय-५७, रा., सदर बाजार जालना) श्रीकांत भिमराव बघे (वय-२७ रा. गोपालनगर खामगाव) अंबादास सुखदेव साळगावकर (४३ रा. माना तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला, रउफ अहमद शेख (४८रा महाळस तालुका जिल्हा बीड) यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी व स्थानिक चोपडा शहर पोलिसांनी पाठलाग करून पकडले. यातील अंबादास साळगावकर या आरोपीवर महाराष्ट्रभरात तब्बल २७ गुन्हे दाखल आहेत. तर श्रीकांत बघे याच्यावर शेगाव येथे गुन्हा दाखल आहे.

प्रल्हाद मान्टे तीन महिन्यांनी होणार होते सेवानिवृत्त….

दरम्यान, प्रल्हाद पिराजी मान्टे तीन महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार होता. मात्र त्यापूर्वी चोपडा बसस्थानकावर चोरी करण्यासाठी आला होता. प्रल्हाद मान्टे हा राज्यभरातील बसस्थानकावर चोरीचे रॅकेट चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. पकडले जावू नये म्हणून तो कधीही हॉटेल किंवा लॉजवर थांबत नव्हता. कारमधून स्वयंपाक बनवण्याचे साहित्य, अंथरूण-पांघरून ताब्यात घेण्यात आले आहे.

चोरांना प्रशिक्षण देत राज्यभरात चालवायचा रॅकेट…..

चोपडा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये प्रल्हाद पिरोजी मान्टे असे अटकेतील जालना येथील पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून तो राज्यभरातील बसस्थानकावर चोरीचे रॅकेट चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, सेवानिवृत्तीला अवघे तीन महिने बाकी असताना चोपडा बसस्थानकावर चोरी करण्यासाठी प्रल्हाद मान्टे आला होता. त्याने चोरीची कबुली दिली आहे. तर बसस्थानकांवरील चोरीच्या घटनांमध्ये त्याचा हातखंडा असल्याने तो अनेक चोरांना प्रशिक्षण देखील देत असल्याची माहिती पुढे आली आहे.

चोरीचे रॅकेट चालवत असल्याचा संशय…..

दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मान्टे हा राज्यभरातील बसस्थानकावर चोरीचे रॅकेट चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. पकडले जावू नये म्हणून प्रल्हाद मान्टे हा कधीही हॉटेल किंवा लॉजवर थांबत नसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्याच्या कारमधून स्वयंपाक बनवण्याचे साहित्य, अंथरूण-पांघरून ताब्यात घेण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई?…..

चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे पीएसआय जितेंद्र वल्टे, एकनाथ भिसे व पोलिस कर्मचारी रितेश चौधरी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, विलेश सोनवणे, दीपक माळी, रवींद्र पाटील, पोलिस नाईक हेमंत पाटील यांनी ही कारवाई केली आहे. पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

मुख्य संपादक संजय चौधरी