जन्मदात्या आईच्या मृतदेह समोरून गेला सरणावर, 8 मुली 1मुलगा पैकी कोणीही अंत्यसंस्कारासाठी तयार होईना, पण जमिनीच्या वाटणीला मात्र…..

Spread the love

सोलापूर :- आई बाळाला 9 महिने आपल्या पोटात वाढवते, लहानाचं मोठं करते, चांगले संस्कार करते पण हीच मुलं मोठी झाल्यावर आईला वाईट वागणूक देत असतील तर त्यापेक्षा दुर्देवी असं काही नाही.स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं म्हणतात. आई शिवाय सर्व काही व्यर्थ आहे. असं असलं तरी आजच्या युगात काही मुलांना आईची किंमत नाही. अशीच एक धक्कादायक आणि तेवढीच संतापजनक घटना समोर आली आहे.

जन्मदात्या आईचा मृतदेह समोरून गेला मात्र अंत्यसंस्कारासाठी 8 मुली अन् सख्खा भाऊ पुढे आला नाही.

ही घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ इथं घडली आहे. वृद्ध आईचा मृत्यू झाल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यास मुलांनीच नकार दिला. विशेष म्हणजे या वृद्ध महिलेला एक नाही तर आठ मुलं आहेत. पण या मुलांनी तिच्या अंत्यसंस्काराकडे पाठ फिरवली. त्यांच्या या कृती मुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.भिमाबाई नागनाथ चटके या सोलापूर जिल्ह्यातील मोहळच्या रहिवाशी होत्या. त्यांचे वय 75 वर्ष होते. त्यांना एकूण आठ मुली आहे. तर एक मुलगा आहे. आईचे वय जास्त झाल्यानंतर त्यांना ऐकता येत नव्हते. शिवाय त्यांची दृष्टीही कमी झाली होती. त्यामुळे भिमाबाईंना सांभाळण्या ऐवजी त्यांच्या मुलांनी त्यांना एक मंदिरात सोडून दिले. पुढे मोहोळ तालुक्यातील मोरवंची येथील प्रार्थना फाउंडेशनच्या प्रसाद मोहिते आणि अनु मोहिते या दाम्पत्याने, आपल्या अनाथ आश्रमात या आज्जीना सांभाळले. पण त्यांचा 2 एप्रिलला याच अनाथ आश्रमात मृत्यू झाला.मृत्यूची बातमी त्यांच्या मुलांना देण्यात आली. त्यावेळी 8 मुली आणि 1 मुलगा आश्रमात आले. मात्र त्या पैकी एकानेही अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला नाही. उलट 8 पैकी 5 मुलींनी आणि भावाने तेथून काढता पाय घेतला. तर 3 मुलींनी अंत्यसंस्काराचे काय ते तुम्हीच बघा असे म्हणत घरची वाट पकडली. त्यामुळे अनाथाश्रमातले लोक हैराण झाले. ज्या मुलांना जन्म दिला. लहानेचे मोठे केले. त्याच मुलांनी शेवटच्या क्षणी आपल्याच त्याच मातेला वाऱ्यावर सोडलं.

याबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे ज्यावेळी भिमाबाई यांच्या पतीचे म्हणजे या मुलांच्या वडिलांचे निधन झाले, त्यावेळी भिमाबाई यांच्या वाट्याला 8 एकर जमीन आली होती. त्यावेळी मात्र या आठही बहिणी आईकडे आल्या होत्या. शिवाय आठ जणींनी मिळून आठ एकर जमीन आपसात वाटून घेतली होती. आईची संपत्ती घेतली पण आईला सांभाळण्याची जबाबदारी यातील एकाही लेकीने किंवा लेकाने घेतली नाही. काळीज नसणारी ही माणसं आहेत अशीच टिका आता होत आहे.

कोणी संभाळलं?…..

अशा परिस्थितीत दुर्देवी आईला कोणी संभाळलं, कोणी तिच्यावर अंत्यसंस्कार केले? असे प्रश्न उपस्थित होतात. मोहोळ तालुक्यातील मोरवंची येथील प्रार्थना फाउंडेशनच्या प्रसाद मोहिते आणि अनु मोहिते या दाम्पत्याने आपल्या अनाथ आश्रमात या आज्जीना सांभाळले. भिमाबाई या मोहिते दाम्पत्याच्या अनाथ आश्रमात राहत होत्या.

कोणीही घेतला नाही पुढाकार…..

मात्र 2 एप्रिल रोजी त्यांचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. यावेळी भिमाबाईंच्या 8 मुली अन् सख्खा भाऊ आश्रमात आले. मात्र एकानेही अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला नाही उलट 8 पैकी 5 मुलींनी आणि भावाने तेथून काढता पाय घेतला. तर उर्वरित 3 मुलींनी अंत्यसंस्काराचे काय ते तुम्हीच बघा असे म्हणत घरची वाट पकडली धक्कादायक बाब म्हणजे वडिलांच्या निधनानंतर आईच्या वाट्याची 8 एकर जमीन सर्व बहिणींनी वाटून घेतली मात्र आईचा सांभाळ एकीनेही केला नाही. प्रार्थना फाउंडेशनचे संचालक प्रसाद मोहिते यांनी यासंदर्भात माहिती दिली. या घटनेमुळे जन्मादाती आई आणि मुलींच्या नात्यातील ओलावा आटल्याने पाहायला मिळाले. प्रार्थना फाउंडेशनचे प्रसाद मोहिते यांनी आपल्या सहकाऱ्यां सोबत भीमाबाई चटके यांच्यावर अंत्यसंस्कार केले. या घटनेमुळे सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्देवी घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.

मुख्य संपादक संजय चौधरी