जळगावात मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्री व्यवसाय; पोलिसांच्या छाप्यात चार महिलांची सुटका, एकास अटक.

Spread the love

जळगाव : शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप जवळील नयनतारा मार्केट मॉल याठिकाणी असलेल्या मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्री व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीवर एलसीबी सह जळगाव शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत चार महिलांची सुटका करण्यात आली असून एकाला अटक करण्यात आली आहे.या कारवाईत चार महिलांची सुटका करण्यात आली असून, दोघा परप्रांतीय आरोपींवर पिटा अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जळगाव शहरातील नयनतारा ऑक्रिड मॉल येथील एका मसाज पार्लर देहविक्रीचा प्रकार सुरू होता. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. संबंधिक व्यक्तीने त्याला बॉडीमसाजसोबत इतर अनैतिक सेवांचे आमिष दिले. याची माहिती त्याने पोलिसांना दिली.पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचला. तसेच छापा टाकून चार महिलांना ताब्यात घेतलं. छाप्यावेळी मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्री होत असल्याचे समोर आले. पोलिसांनी महिलांची सुटका करून त्यांना स्थानिक संरक्षण गृहात पाठवण्यात आले.

तर, पार्लर चालवणाऱ्या दोघा परप्रांतिय आरोपींवर पिटा अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंजवण्यात आला आहे.देहविक्रीवर या अनैतिक व्यवसायावर जळगावचे शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल भवारी, एलसीबीचे उपनिरीक्षक शरद बागल, सपोनी शितल कुमार नाईक, उपनिरीक्षक महेश घायतळ, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी