दुर्गसंवर्धन कार्याचा संदेश देत पार पडला शिव विवाह सोहळा

Spread the love


चाळीसगाव प्रतिनिधी-नेहा राजपूत :- चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र दे येथील माजी सरपंच संजय परशराम पवार व सौ ज्योती संजय पवार यांची कन्या तसेच शिवभक्त हर्षल संजय पवार यांची भगिनी ची. सौ. का. युक्ती व चि. महिंद्र यांचा विवाह दिनांक १९ एप्रिल रोजी विराम लॉन्स येथे
समाजातील अनावश्यक अशा जुनाट रूढी परंपरांना बगल देत दुर्गसंवर्धन कार्याचा आणि शिव विचारांचा संदेश देत शिव विवाह पद्धतीने पार पडला यात पारंपरिक ब्राह्मण मंगलाष्टके यांच्या ऐवजी जिजाऊ वंदन शिव वंदन म्हणून वधूवरांनी एकमेकांच्या गळ्यात माळा टाकल्या आणि लग्नात आलेल्या वऱ्हाडी मंडळींना साड्या भांडे भेट म्हणून देण्याऐवजी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील शाक्तवीर शंभूराजे हे पुस्तक व सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणी ची मूर्ती देण्यात आली त्याचबरोबर सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसंवर्धन कार्याबद्दल असलेले संदेश लिहिलेले फलक या लग्नसमारंभात प्रवेशद्वारापासून ते मंडपा पर्यंत लावण्यात आलेले होते याचे विशेष आकर्षण आलेल्या मंडळींना वाटले आणि याच समारंभात पवार परिवारा तर्फे महाराष्ट्रातील गड किल्ले संवर्धनासाठी सह्याद्री प्रतिष्ठानला रोख स्वरूपात १११११ (अकरा हचार एकशे अकरा) रुपयांचा निधी देण्यात आला यावेळी या विवाह समारंभात साठी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते

टीम झुंजार