जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) :– मुंबई येथे पार पडलेल्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान २०२३-२४ च्या राज्यस्तरीय समारंभात एरंडोल नगरपरिषदेच्या “पुस्तकांचा बगीचा” या उपक्रमास राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार तत्कालीन मुख्याधिकारी श्री. विकास नवाळे व सद्यस्थितीत कार्यरत मुख्याधिकारी श्री. अमोल बागुल, कर निरीक्षक अजित भट यांनी स्वीकारला.
समारंभास राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मा. श्री. मंगलप्रभात लोढा तसेच राज्याचे मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांची प्रमुख उपस्थिती होती.”पुस्तकांचा बगीचा” या उपक्रमाच्या माध्यमातून नगरपरिषदेच्या बागेमध्ये वाचनासाठी अनुकूल व प्रेरणादायी वातावरण निर्माण करण्यात आले असून, नागरिकांमध्ये वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे.या उल्लेखनीय कार्याबद्दल एरंडोल नगरपरिषदेचे जिल्हा प्रशासनातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.—