अमळनेर:- पोलीस स्टेशनच्या पथकाने घरगुती गॅस सिलिंडरचा बेकायदेशीर वापर करून वाहनात गॅस भरणाऱ्या टोळीवर छापा टाकत तब्बल ३८ गॅस सिलिंडर जप्त केले आहेत.याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.
शहरातील श्रीकृष्ण कॉलनी येथील खुल्या जागेत घरगुती वापरासाठी असलेल्या एचपी व भारत गॅसच्या सिलिंडरद्वारे खाजगी वाहनांमध्ये गॅस भरण्याचा अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, गुरुवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत धनंजय प्रभाकर पाटील (वय ४८, रा. श्रीकृष्ण कॉलनी) आणि अमोल सुभाष बोरसे (वय ३७, रा. धार, ता. अमळनेर) यांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडून १ लाख ५० हजार रुपये किमतीची चारचाकी वाहन (MH-43-AN-1174)४ सीलबंद व ११ रिकामे भारत गॅस सिलिंडर (८+११ हजार रुपये किमतीचे)३ रिकामे एचपी गॅस सिलिंडर (३ हजार रुपये किमतीचे) २० हजार रुपये किमतीचा गॅस भरण्याचा इलेक्ट्रिक पंप व नळ्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला:
२२ एप्रिल रोजी पाचपावली मंदिर परिसरात अशीच एक दुसरी कारवाई करण्यात आली. पोलिसांनी जयेश संजय साळी (वय २७, रा. शिरूड नाका) आणि चंदन प्रल्हाद साळी (वय ४५, रा. रामेश्वर नगर, शिरूड नाका) यांना वाहनात गॅस भरताना रंगेहाथ पकडले.त्यांच्याकडून ७ भरलेले गॅस सिलिंडर (१४ हजार रुपये किमतीचे)६ भारत गॅसचे रिकामे सिलिंडर (६ हजार रुपये किमतीचे) १० एचपी गॅसचे रिकामे सिलिंडर (१० हजार रुपये किमतीचे) गॅस भरण्याचा पंप व अन्य साहित्य (१० हजार रुपये किमतीचे) असा मुद्देमाल् जपत करण्यात आला .
ही कारवाई परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) केदार बारबोले आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, प्रशांत पाटील, विनोद संदानशीव, उज्वल म्हसके आणि नितीन कापडणे यांच्या पथकाने केली.