अपूर्ण अवस्थेतील घरकुल योजना पूर्ण करून बेघरवासीयांना घरकुले मिळून द्यावीत; एरंडोल येथील घरकुलांचे भिजत घोंगडे सोडण्याची आमदार अमोलदादा पाटील यांच्याकडे मागणी.

Spread the love

एरंडोल : – सुमारे दहा-बारा वर्षांपासून दहा कोटी रुपये खर्च करून एरंडोल न.पा. तर्फे बेघरवासियांना एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी विकास योजने कार्यक्रमांतर्गत शहरातील बेघर लोकांचे सर्वेक्षण करून एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी योजनेअंतर्गत घरकुल योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत न.पा हद्दीतील पुरा भागात लेंडी नाल्याजवळ जागा मंजूर करण्यात येवून जळगाव येथील पद्मालय कन्स्ट्रक्शनला घरकुलाचे काम देण्यात आले होते. त्यानुसार घरकुलांचे काम सुरू झाले परंतु सुमारे दहा वर्षापासून हे घरकुलांचे काम अपूर्णावस्थेत पडले असून आतापर्यंत त्यावर दहा कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. परंतु अद्यापपावेतो एकही घरकुल बेघरांना मिळालेले नाही.

दरम्यान आमदार अमोलदादा पाटील यांनी मतदार संघाचा विकास करण्याचा सपाटा सुरू केला आहे. युवकांना रोजगार मिळावा म्हणून एमआयडीसी मंजूर केले आहे. मतदारसंघातील बेघर वासीयांना घरकुल मिळण्यासाठी शबरी घरकुल योजना आणि पंतप्रधान आवास योजनेचे उद्दिष्ट वाढवून मिळण्यासाठी आमदार अमोलदादांनी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके आणि ग्रामविकास तसेच पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन बेघरवासीयांचे उद्दिष्ट वाढवण्याची मागणी त्यांनी केली आहे . त्याचप्रमाणे एरंडोल शहरातील सुमारे 650 बेघर वासियांचे घर मिळण्याचे स्वप्न साकार होवून अपूर्ण अवस्थेत पडलेली घरकुल योजना पूर्ण करावी आणि बेघर वासीयांना घरकुले मिळून द्यावी अशी मागणी बेघरवासियांनी आमदार अमोलदादा पाटील यांच्याकडे केली आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी