तीन अल्पवयीन मुलींना नग्नावस्थेत पुजेला बसवा मी पैशाचा पाऊस पाडतो भोंदूबाबाकडून मुलींचे लैंगिक शोषण,एक महिलेसह दोघांना अटक.

Spread the love

नागपूर :- एका भोंदू बाबाने तीन अल्पवयीन (Minor) मुलींचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पैशाचा पाऊस पाडतो, त्यासाठीच्या पूजेसाठी तीन अल्पवयीन मुली लागतील अशी बतावणी करून शोषणकेल्याचं समोर आलं आहे.या प्रकरणी पोलिसांनी भोंदू बाबा अब्दुल कुरैशी उर्फ कंदील बाबा याच्यासह एकूण आणखी दोन आरोपींना अटक केली आहे.

अब्दुल कुरैशी उर्फ कंदील बाबाने नागपुरात काही जणांना आपल्या जाळ्यात फसवल्याचं स्पष्ट झालं. पैशाचा पाऊस पाडणे शक्य आहे, त्यासाठी विशेष पूजा करावी लागेल, आणि त्यासाठी तीन अल्पवयीन मुली लागतील असं त्याने सांगितलं. तिन्ही मुलींना पूजेच्या वेळेला नग्नावस्थेत बसावे लागेल अशी बतावणी केली होती. त्यानंतर आशू कोचे आणि गायत्री उकरे नावाच्या पुरुष आणि महिलेने तीन अल्पवयीन मुलींची व्यवस्था केली.

काही दिवसांपूर्वी गायत्री उकरेच्या घरी पूजेचे आयोजन करण्यात आले आणि त्याच ठिकाणी भोंदू बाबाने तीनही अल्पवयीन मुलींचे एकानंतर एक असे शारीरिक शोषण केले. मुलींना यासाठी गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करण्यात आले होते. भोंदू बाबाच्या या कृत्यानंतर पैशाचा पाऊस तर पडलाच नाही, मात्र तिन्ही मुलींना त्यांचे लैंगिक छळ झाल्याचे समजले.

मुलींनी पोलिसात तक्रार केली…..

एका ओळखीच्या व्यक्तीच्या मार्फत तिघींनी नागपूरच्या मानकापूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी भोंदू बाबा अब्दुल कुरेशी याच्यासह गायत्री उकरे आणि आशू कोचे या तिघांना अटक केली आहे. पोलिसांना आरोपींच्या मोबाईलमध्ये इतर काही मुलींचे फोटो आढळल्यामुळे या भोंदू बाबा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आणखी काही मुलींचे लैंगिक शोषण केले आहे का याचा शोध पोलीस घेत आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी