जळगाव :- शहर तरुणाच्या खुनाच्या घटनेने हादरले आहे. ३० वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या झाली. ही घटना जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरात ३ मे रोजी रात्री ११ वाजता घडली आकाश पंडीत भावसार (वय ३०, रा. अयोध्या नगर) असं खून झालेल्यातरुणाचं नाव असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव शहरातील कालंका माता मंदिर परिसरात तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून पत्नीच्याच नातेवाईकांनी तरुणावर हा हल्ला करत त्याची हत्या केली आहे. आकाश पंडित भावसार असे हत्या करण्यात आलेल्या आहे.
आकाश भावसार व त्याच्या पत्नीचे कौटुंबिक वाद होते व या वादातून पत्नीच्या नातेवाईकांनी आकाशला रस्त्यावर गाठत त्याच्यावर धारदार शास्त्राने हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आकाशला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवले आहे. या प्रकरणात चार संशयितांची नावे समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली असून संशयीतांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे जळगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, अकोला शहरातील तारफाईल परिसरात दुहेरी हत्याकांडने हृदयाला पिळवून टाकणारी घटना शनिवारी दुपारी समोर आली. पतीने आपली पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. हत्येनंतर आरोपीने स्वतः पोलिसांना फोन करून याबाबतची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलीस घटनास्थळी पोहचून आरोपीस ताब्यात घेतले.
आकाश यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय पथकाने तपासून त्याला मयत घोषित केले. दरम्यान, रुग्णालयात उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, शनिपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत. ४ संशयीत तरुणांची नावे समोर आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.