अधिकारी ठेकेदारांविरुद्ध न्यायालयात दाद मागणार ; उपजिल्हाप्रमुख ॲड.शरद माळी, धरणगाव येथे ठाकरे गटाची पत्रकार परिषद

Spread the love

धरणगाव (प्रतिनिधी ) :- शहरातील धरणी नाल्यालगत असलेल्या संरक्षण भिंतीचे कामकाज निकृष्ट दर्जाचे चालू होते. या कामकाजाच्या चौकशीसाठी ठाकरे गटाचे शिवसेनेचे शहरप्रमुख भागवत चौधरी यांनी आमरण उपोषण मांडले होते. परंतु, अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसात चौकशी करण्याचे आश्वासन दिले आणि उपोषण मागे घेण्यात आले होते अद्यापही कोणतीही चौकशी न झाल्याने अधिकारी ठेकेदारांविरुद्ध न्यायालयात दाद मागणार असल्याचे ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख ॲड. शरद माळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.धरणगाव येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

ॲड. शरद माळीपुढे म्हणाले की, उच्च न्यायालयात धरणगावाच्या पाणी प्रश्न बाबत जनहित याचिका क्रमांक 67/ 2024 दाखल करण्यात आली आहे .. 22 मार्च 2022 रोजी धरणगाव येथील पाणीपुरवठा योजना व देखभाल दुरुस्तीसह वर्क ऑर्डर अर्थात कार्यारंभ आदेश प्रगती कंट्रक्शन लातूर यांना देण्यात आला होता. परंतु,अद्यापपर्यत धरणगावकरांना पाणी मिळत नाही. त्यामुळे ही योजना देखील पूर्णपणे निष्क्रिय ठरलेली आहे.झुमकराम वाचनालयाच्या जागेवर व्यापारी गाडे काढलेले आहेत. या गाड्यांच्या लिलावासाठी ई टेंडर काढण्यात आले याबाबत सामान्य लोकांना कोणतेही सूचना न देता आधीच काही लोकांकडून अगोदरच पैसे घेऊन ठेवलेले असल्याची बाब समोर येत आहे.

पावसाळा पंधरा ते वीस दिवसानंतर आला असताना टिळक तलावातील पाण्याच्या स्त्रोत जिवंत करून नागरिकांना पाणी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. ठाकरे गटातील धरणगावातील एक प्रतिष्ठित जुना नेता भाजपात जाणार असल्या बाबत पत्रकारांनी विचारले असता ॲड. शरद माळी व भागवत चौधरी म्हणाले की, संजय सावंत यांनी पहिली बैठक धरणगावात घेतली असता संबंधित नेत्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. त्यामुळे धरणगावातील ठाकरे गटासोबतचे सर्वच नेते एकनिष्ठ असून भाजपात जाण्याच्या प्रश्नच उद्भवत नाही.

ठाकरे गटाचे शहरप्रमुख भागवत चौधरी यांनी आपण आमरण उपोषणाला बसलो असता अधिकारी यांनी दिशाभूल करून व आश्वासन देऊन आपल्याला उपोषण सोडण्यास भाग पाडल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेला बापू महाजन, रणजीत शिखरवार ,परमेश्वर महाजन,ॲड.सागर महाजन आदी कार्यकर्ते उपस्थित होते

मुख्य संपादक संजय चौधरी