नवाब मलिकांना दिलासा नाहीच; न्यायालयीन कोठडीत ९ मेपर्यंत वाढ

Spread the love

मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत ९ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आज दि. २२ एप्रिलला त्यांची न्यायालयीन कोठडी संपली होती. त्यांना आज विशेष पीएमएलए कोर्टात दाखल करण्यात आले होते. आणि याच वेळी हा निर्णय देण्यात आला आहे…

मनी लॉंड्रिंग प्रकरण आणि दाऊद सोबत संबंध असे अनेक आरोप नवाब मलिक यांच्यावर आहेत. आणि याच आरोपांवरून मालिकांना ईडीने त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलं होते. मलिक यांच्या कुर्ला येथील निवासस्थानी पहाटे पाचच्या सुमारास ‘ईडी’चे अधिकारी पोहोचले होते.

यानंतर त्यांना ईडी कार्याललायत नेण्यात आलं होतं. सकाळी साडेसातच्या सुमारास मलिक यांना ईडीच्या बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात आणण्यात आले. सुमारे साडेसात तास चौकशी केल्यानंतर मलिक यांना दुपारी पावणे तीनच्या सुमारास अटक करण्यात आली. आणि त्यानंतर मालिकांना ईडीची कोठडी देण्यात आली.

टीम झुंजार