एरंडोलला ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद.हजारो नागरीकांचा सहभाग.

Spread the love

एरंडोल :- भाजपतर्फे ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीत हजारो नागरिक तिरंगा ध्वज घेवून सहभागी झाले होते.सुमारे शंभर मीटर लांबीचा तिरंगा ध्वज रॅलीचे विशेष आकर्षण होते. रॅलीत महिला व युवकांची उपस्थिती लक्षणीय होती. कासोदा दरवाजा परिसरातील श्रीराम मंदिरापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. रॅलीत सहभागी झालेले नागरिक ‘भारत माता की जय’,’वंदे मातरम’,’जयहिंद’ यासह विविध घोषणा देत होते.

यावेळी पाकिस्तानच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. श्रीराम मंदिर, परदेशी गल्ली,मारवाडी गल्ली,भगवा चौक,माळीवाडा, नागोबा मढी या मार्गाने रॅलीकाढून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीच्या मार्गावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी खासदार स्मिताताई वाघ यांचेसह उपस्थित प्रमुख पदाधिका-यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत माहिती दिली.महिला व युवकांनी दिलेल्या पाकिस्तान विरोधातील घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

शहरासह ग्रामीण भागातील आजीमाजी सैनिक,अग्निवीर, वीरमाता, वीरपत्नी,राजकीय,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी, व्यावसायिक यांचेसह हजारो नागरिकांनी रॅलीत सहभागी होऊन भारतीय जवानांच्या शौर्याला प्रणाम केला. रॅलीत खासदार स्मिताताई वाघ,भाजप पच्छिम विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ.राधेशाम चौधरी,माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी,राजेंद्र चौधरी,दशरथ महाजन,रवींद्र महाजन,किशोर निंबाळकर, माजी उपनगराध्यक्ष अशोक चौधरी,जगदीश ठाकूर, सुनील पाटील,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश महाजन,माजी तालुकाध्यक्ष एस.आर.पाटील,शहराध्यक्ष नितीन महाजन,जिल्हा उपाध्यक्ष भिका कोळी, जिल्हासरचिटणीस निलेश परदेशी,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नाना महाजन,

सामाजिक कार्यकर्ते भगवान महाजन,अजित पाटील,समाधान पाटील, गजानन महाजन,जगन्नाथ पाटील,दिलीप पांडे, गणेश शिंदे,कृष्णा महाजन, पल्लवी पाटील,निशा विंचूरकर,माजी नगरसेविका हर्षाली महाजन,रामभाऊ गांगुर्डे,भाजप उद्योग आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा मीनाक्षी पाटील यांचेसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थितांमध्ये महिला व युवकांची संख्या लक्षणीय होती.

मुख्य संपादक संजय चौधरी