Viral Video: देशात अनेक वर्षांपासून हृदयविकाराच्या झटक्यानं होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या हृदयविकाराच्या झटक्यानं तरुण आणि मुलांसह अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलदेखील झाले आहेत. सध्या अशीच घटना उत्तराखंडमधील पौडी गढवाल येथे घडली आहे. तरुणाचा दुर्दैवी मृत्यू सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आणि या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उत्तराखंडमधील पौडी गढवाल येथे एका अतिशय अस्वस्थ करणाऱ्या घटनेत, सकाळी घराबाहेर व्यायाम करत असताना एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाला. द फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, पीडितेचे नाव प्रमोद बिंजोला असे आहे,
व्यायाम करायला गेला अन्…
या दुःखद घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाले आहे आणि ते खूपच भयानक आहे. स्थानिकांमध्ये आरोग्य आणि फिटनेससाठी ओळखला जाणारा प्रमोद सकाळी लवकर नियमित व्यायामासाठी बाहेर पडला होता.या दुःखद घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाले आहे आणि ते खूपच भयानक आहे. स्थानिकांमध्ये आरोग्य आणि फिटनेससाठी ओळखला जाणारा प्रमोद सकाळी लवकर नियमित व्यायामासाठी बाहेर पडला होता.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण पाहू शकतो तो जंपिंग जॅक नावाची एक्सरसाईज करत होता. दरम्यान, त्याला अस्वस्थ वाटले आणि तो थोडा विश्रांती घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या स्लॅबवर बसला. तथापि, काही वेळेनंतरच, तो अचानक जमिनीवर पडला आणि त्याला झटके येऊ लागले. त्यावेळी रस्ता रिकामा होता आणि आजूबाजूला मदतीसाठी धावून येणारही कोण दिसत नव्हतं. त्यानंतर काही वेळातच परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले आणि प्रमोदला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु पोहोचताच त्याला मृत घोषित करण्यात आले. सुरुवातीच्या अहवालांनुसार मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे दिसून आले आहे.सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @dharmendra0207 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून ‘पौडी गढवाल येते व्यायाम करताना एक तरुण खालीच कोसळला आणि लगेचच त्याचा मृत्यू झाला. अशा प्रकारे शेकडो मृत्यू झाले आहेत. एखाद्या व्यक्तीला रुग्णालयात पोहोचण्याचीदेखील संधी मिळत नाही.. नेमकं चाललंय तरी काय. सरकार यावर काही संशोधन करत आहेत का की ही एक नवीन सामान्य परिस्थिती आहे?’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, ‘वाईट वेळ कधी सांगून येत नाही’ तर दुसऱ्याने ‘आजकाल व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे’ अशी कमेंट केली.






