एरंडोल :- कासोदा तालुका एरंडोल येथील पांडे नगर मधील रहिवाशी संजय धना शिवदे यांची पुतणी कुमारी दिपाली अशोक शिवदे वय १९ वर्षीय युवतीने काल दिनांक २६ मे मंगळवार रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास बांभोरी खुर्द शिवारातील शैलेश सोनार यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन पाण्यात बुडल्याने मयत झाली असल्याची तक्रार मुलीचे काका संजय धना शिवदे यांनी कासोदा पोलीस स्टेशनला मंगळवारी सकाळी ७:३० वाजता खबर दिल्यावरून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३चे कलम १९४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मरणाचे कारण अद्याप समजले नाही सदरच्या तपास कासोदा पोलीस स्टेशनचे सपोनि. निलेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी उपनिरीक्षक दत्तू खुळे हे करीत आहेत.