झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
अंथुंर्णे : ( ता. इंदापूर) येथे राजगृह बुद्ध विहार समिती अंथुंर्णे महात्मा फुले कॉलनी (उखळमाळ ) येथे भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती निमित्ताने “बाबासाहेब आणि शिक्षणाचे महत्त्व “या विषयावर ती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रयतेचा भीम प्रहार साप्ताहिकाचे संपादक भीमसेन उबाळे सर, अमर बोराटे सर, प्रा. कपिल कांबळे सर (विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब), वंचित बहुजन आघाडीचे नेते राजकुमार, मी आंबेडकरवादी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरज वंचाळे, ॲड. संजय चंदनशिवे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. अरुण कांबळे सर (उपप्राचार्य विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब) हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, माता रमाई, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, यांचे प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करून झाली.
याप्रसंगी भीमसेन उबाळे सर यांनी उपस्थितांना शिक्षणाचा दर्जा घसरत चालला आहे. त्यासाठी बहुजन युवक जागा असला पाहिजे. तर ॲड. संजय चंदनशिवे यांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते आपल्या मुलांना दिल्या शिवाय आपण बाबासाहेबांचा लढा पुढे नेणार नाही. त्यासाठी आपण आपल्या मुलांसाठी शिक्षणाच्या बाबतीत जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे असे प्रतिपादन करत त्यांनी विद्रोही कविता सादर केली.
यावेळी उपस्थित बांधवांना मार्गदर्शन करताना राजकुमार यांनी बाबासाहेबांची जयंती भारतातच नाही तर जगात शंभर देशात साजरी केली जाते असे एकमेव महामानव आहेत. जे त्यांचे अस्तित्व त्यांच्या बुद्धीच्या जोरावर निर्माण केले आहे असे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले.
याप्रसंगी अध्यक्षीय भाषण करताना प्रा. डॉ. अरुण कांबळे सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, यांचा परस्परांशी कसा संबंध आहे हे त्यांनी त्यांच्या जीवनावर आधारित अनेक प्रसंग व त्यांचे श्रेष्ठ विचार, कर्तुत्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले. पुढे ते म्हणाले शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. तुम्ही उपाशीपोटी रहा पण आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्या. व्यसनांपासून दूर राहा.असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी अंथुर्णे गावचे सरपंच लालासो खरात, ग्रा .पंचायत सदस्य किशोर रणमोडे, ग्रा. पंचायत सदस्य रेणुका कांबळे, पत्रकार संतोष कदम ,प्रगतशील बागायतदार विकास व विशाल रणमोडे, सामाजिक कार्यकर्ते बाळू वाघ व गोरख खंडागळे, माजी उपसरपंच संजय वंचाळे व राघू गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ. अरुण कांबळे सर यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी पीएचडी संपादन केली आहे. व पंधरा दिवसापूर्वी त्यांना जागतिक आंबेडकरी साहित्य महामंडळाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. यासाठी सरांचा राजगृह बुद्ध विहार समिती व महात्मा फुले कॉलनी वरील सर्व नागरिकांच्या वतीने सरांचा यथोचित सत्कार, गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋत्विक लोंढे व ऋषिकेश गंगणे यांनी केले. तर आभार सुनील केंगार यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष दत्ता काटे व उपाध्यक्ष राहुल सरवदे, संतोष कांबळे, अतुल बनसोडे, विकास खरात, संतोष गवळी, संजय धीमधीमे , स्वप्निल धीमधीमे, श्रीराज केंगार, नितीन केंगार, अविनाश अहिवळे, सुशील चंदनशिवे आदी सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्ती सभोवताली केलेली विद्युत रोषणाई व कारंजे आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे लक्ष वेधून घेत होती. उत्सव कमिटीने सर्वत्र विद्युत रोषणाई डेकोरेशन केले होते त्यामुळे विद्युत रोषणाईने संपूर्ण बुद्ध विहार परिसर उजळून निघाला होता.
सायंकाळी ठीक ९:३० वाजता भीम गीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील सर्व समाजबांधवांनी उपस्थिती दाखवत कार्यक्रमाचा आनंद घेतला.