धरणगाव :- तालुक्यातील नांदेड या गावी दिनांक 5 मे 2025 रोजी रात्री 11.30 वाजता आदिवासी कोळी मल्हार जमातीच्या महिलेवर शिवीगाळ लज्जास्पद वागणूक व जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिली असा प्रकार आरोपी हर्षल प्रकाश पिंपळकर व मंगलबाई प्रकाश पिंपळकर यांच्याकडून करण्यात आला.
झालेला प्रकार आदिवासी महिलेने गावातील पोलीस पाटील यांना सांगितला त्यावेळी पोलीस पाटील यांनी सांगितले की आपण पोलीस स्टेशनला जाऊन योग्य ती तक्रार दाखल करा ..
याबाबत 6 मे 2025 रोजी धरणगाव पोलीस स्टेशन येथे येऊन आरोपीने माझ्याबरोबर केलेली लज्जास्पद वागणूक संदर्भात त्याच्यावर गुन्हा दाखल केला सदर गुन्हा भा.न्या.स. कलम ७४,७८,२९६,३५१(१),३५१ (२), ३५२,११५ (२) सह अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ चा सुधारीत अधिनियम सन २०१५चे कलम ३ (१) (r),३(१) (s), ३(२) (v-a),३(१) (W) आदिवासी कोळी महिलेला त्रास दिल्या प्रकरणी आरोपीवर वरील कलमानव्हय गुन्हा दाखल करण्यात आला आहे..