Viral Video: सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. स्टंट, जुगाड, भांडण, डान्स रिल्स, अपघातांचे व्हिडिओ अशा अनेक गोष्टी सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात.शिवाय काही तरुणांचे मुलींसोबत गैर-वर्तनाचे प्रकार देखील या सोशल मीडियामुळे उघडीस आले आहेत. याचेही अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. असे व्हिडिओ पाहिल्यावर तळपायाची आग मस्तकात जाते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
एका तरुणाने स्कूटीवरुन जाताना एका मुलीची छेड काढली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका गल्लीतून एक बुरखा घातलेली महिला आणि एक चिमुकली मुलगी चालले आहे. गल्लीत कोणीही इतर माणूस दिसत नाही. याचाच फायदा घेत तिथून स्कूटीवरुन जात असलेला तरुण बुरखा घातलेल्या तरुणीची छेड काढून पळून जातो. तरुण तरुणीच्या गालावर चुंबन घेऊन तिथून निघून जातो. हे सगळे प्रकरण एवढ्या पटकन घडते की, मुलगी केवळ त्या तरुणाला अपशद्बच बोलू शकते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये घडली आहे. याचा सीसीटीव्ही फूटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तरुणाने महिलेलसोबत गैर-वर्तन केल्याची ही घटना मेरठच्या लिसीडी गेट पोलिस स्टेशन परिसरता घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी महिलेला अस्पर्श केल्याच्या आणि छेड काढल्याच्या आरोपाखील तरुणाला अटक केली आहे.नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
दरम्यान व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @priyarana3101 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आहे. अनेकांनी यावर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशा लोकांमुळेच आज महिला सुरक्षित नाही असे म्हटले आहे. तसेच लोकांनी तरुणाविरोधात कारवाईची मागणी केली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या संतापाचे कारण बनला आहे. अलीकडे मुलींसोबतच्या छेड-छाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.