
पारोळा – तालुक्यातील विटनेर विविध कार्यकारी सोसायटीची निवणडुक १२ एप्रिल रोजी पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेच्या जागेसाठी १३ जागेसाठी मतदान प्रक्रीया घेण्यात आली. या निवडणुकीत सेनेने दाखल केलेल्या १३ अर्जांच्या विरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी योगेश बाबुराव पाटील यांनी १३ च्या १३ जागा बिनविरोध विजयी झाल्याचे घोषित केले. या विजयाने विटनेर विकासोवर शिवसेनेने १३ पैकी १३ जागांवर बिनविरोध विजय मिळवत भगवा फडकविला आहे.
अध्यक्ष पदी – नंदकीशोर सांडु पाटील, उपाध्यक्ष – सौ.भारतीबाई गोपाल पाटील, सदस्य – भादु राजधर पाटील, पंडीत हरसिंग पाटील, भगवान कौतिक पाटील, प्रकाश नामदेव पाटील, भाऊसाहेब भिका पाटील, रामसिंग धनसिंग पाटील, रघुनाथ आनंदा पाटील, गुंताबाई राजाराम पाटील, जिजाबाई खुशाल धनगर, हिंमत कौतिक चांभार, एकनाथ वासुदेव माळी अशी विजयी उमेदवारांची नावे आहे. या सर्व विजयी उमेदवारांचे आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी दुरध्वनीव्दारे तर पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक मा.अमोलदादा पाटील यांनी सत्कार करून शुभेच्छा देत अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच हि निवडणुक योग्यरित्या हाताळणारे सचिव प्रविण साहेबराव पाटील यांचा देखिल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पारोळा बाजार समिती उपसभापती दगडुबापु पाटील, संचालक चतुरभाऊसाहेब पाटील, मा.सरपंच सुनिल भादू पाटील, विलास भिका पाटील, ईश्वर कौतिक पाटील, गोपाल तुकाराम पाटील, दयाराम ताराचंद मोरे, धर्मसिंग काशिनाथ पाटील, ईश्वर ताराचंद मोरे, रमेश राजाराम पाटील, रविंद्र देविदास पाटील, नंदु पंडीत देवरे, अशोक दामु अहिरे, ईश्वर संतोष माळी, काशिनाथ पाटील यांचेसह आदी उपस्थित होते.