अमळनेर तालुक्यात तापी नदीत बुडून दोन शाळकरी मुलांच्या मृत्यू,दोन दिवसापासून पांच मुलं जायची पोहायला पण गावात लग्न असल्याने तीन राहिले होते घरी.

Spread the love

अमळनेर :- पाडळसरे येथून जवळच असलेल्या निम ता अमळनेर येथे दिनांक 2 रोजी तापी नदीत दुपारी 4 वाजता दोन शाळकरी मुले पोहायला गेले असतांना दोन्ही शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी घडली घडल्याने गावात शोककळा पसरली . चेतन अरुण सुतार वय 10 वर्षे, इयत्ता 3 री हरीश बाळू पाटील वय १२ वर्षे इयत्ता 5 वी अशी मृत झालेल्या मुलांची नावे असून चेतन अरुण सुतार ह्या मुलाचा मृतदेह सापडला असून शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे, त्यास डॉक्टर जी एम पाटील यांनी तपासून मृत घोषित केले आहे,तर दुसरा मृतदेहाचा पट्टीचे पोहणारे शोधत आहे मृतदेह शोधण्याचे प्रयत्न रात्री उशिरा पर्यंत चालू होती , तलाठी जितेंद्र जोगी यांनी रात्री उशिरा पर्यत तापी नदी काठी थांबून नावळकी यांची ही मदत घेतली जात आहे, घटनास्थळी मारवड पोस्टचे सपोनि जिभाऊ पाटील, साहायक फौजदार फिरोज बागवान,संजय पाटील, अगोने यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास करीत आहे

मृत चेतन अरुण सुतार याची आई माहेरी कुरवेल ता चोपडा येथे बहिणीला घेण्यासाठी गेली असता घरी फक्त वृद्ध आजी आजोबा होते, हरीश बाळू पाटील यांचे वडिलांची पानटपरी असल्यामुळे आज गावात लग्नाला आलेल्यांची गर्दी असल्यामुळे दुकान चालू होते, याच संधीचा फायदा दोन्ही मुलांनी घेतला आणि तापी नदीत पोहायला जाण्याचा बेत आखला होता असा किस्सा त्याच्या मित्रानी सांगितला, सलग दोन दिवस झाले एकूण समवयस्क पांच मुले नदीवर पोहायला जात होते मात्र ही बाब कुटुंबियांना माहित नसतांना आज लग्ना निमित्त इतर तीन मुले पोहायला गेले नाहीत म्हणून वाचली आणि दोन्ही मुलांचा मात्र बुडून मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे, गावातील गुर्जर व सुतार समाजातील दोन्ही शाळकरी मुले असल्यामुळे गावात चुलच पेटली नाही, दोन्ही समाजातील शेकडो लोक रात्री उशिरा पर्यत नदीथली थांबून होते

मुख्य संपादक संजय चौधरी