मुंबई :- राज्यभरात आणि मुंबईत दिवसेंदिवस एकाहून एक भयानक गुन्हे घडताना उघडकीस येताना दिसत आहेत. मुंबईतील उपनगरांपैकी एक असलेल्या चेंबूरनमध्येही असाच एक हादरवणारा आणि अतिशय भयानक प्रकार घडला आहे.सेक्स करण्यास नकार दिला म्हणून एका इसमाने त्याच्या पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमध्ये 38 वर्षांची ही विवाहीत महिला जवळपास 70 टक्के भाजली असून तिची प्रकृती गंबीर आहे. सध्या तिच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.
चेंबूरच्या वाशी नाका येथील धक्कादायक प्रकार असून या कारणावरून पत्नीला जाळणाऱ्या पतीविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. या घटनेमुळे चेंबूरमध्ये अतिशय खळबळ माजली असून नागरीक दहशतीत आहेत.
नेमकं काय घडलं ?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही 38 वर्षांची असून चेंबूरच्या वाशीनाका येथे पतीसह राहते. काल म्हणजेच 30 मे रोजी ती सकाळी उठली आणि कामावर जाण्यासाठीतयारी करत होती.मात्र तेवढ्यात तिच्या पतीने तिच्याकड सेक्स करण्याची मागणी केली. मात्र आत्ता शक्य नाही , कामावर जायला उशीर होईल असे सांगत महिले शारीरिक संबंधास नकार दिला. तिचा नकार ऐकून पती संतापला आणि रागाच्या भरात त्याने घरातील केरोसिनचा डबा उचलला आणि ते केरोसिन बायकोच्या अंगावर ओतलं. काडी लावून तिला पेटवून दिला. आगीच्या ज्वाळांमध्ये अडकलेली महिला आक्रोश करू लागली.
तिचा आवाज ऐकून शेजाऱ्या-पाजाऱ्यांनी लगेच धाव घेतली आणि तिला उपचारांसाठी तत्काळ सायन रुग्णालयात दाखल केलं. या घटनेत महिला 70 टक्क्यांपेक्षा अधिक भाजली असून प्रकृती गंभीर आहे. सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी पतीविरोधात हत्येचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचार या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे चेंबूरमध्ये परिसरात खळबळ उडाली आहे.