एरंडोल :- येथील ज्ञानदीप चौक परिसरातील ३४ वर्षीय विवाहितेने
चारित्र्याच्या संशयावरून होत असलेल्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत विवाहितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून विवाहितेचा पती,सासू,जेठ व जेठाणी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत माहिती अशी,की शहरातील ज्ञानदीप चौकातील शामकांत बाळकृष्ण सोनार, पत्नी मंगलबाई सोनार,मुलगा गणेश सोनार,सून राणी सोनार हे काल
(ता.४) रात्री दहा वाजेच्या सुमारास जेवण करून बसले होते.
शामकांत सोनार यांची लहान सून मनिषा सागर सोनार (वय-३४) ह्या घराच्या वरच्या मजल्यावर असल्यामुळे मुलगा शर्विल सोनार हा त्यांना जेवण्यासाठी बोलावण्यासाठी गेला. मात्र वरच्या मजल्याचा घराचा दरवाजा बंद असल्यामुळे गणेश सोनार व त्यांचे चुलत भाऊ हेमंत रामचंद्र सोनार हे वरच्या मजल्यावर गेले.त्यांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला मात्र दरवाजा न तुटल्यामुळे खिडकी तोडून
घरात प्रवेश केला असता त्यांना मनीषा यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले.त्यांनी तातडीने मनीषा यांना ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्या मयत झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.
याबाबत मनिषाचे भाऊ मनोज माधवराव पोतदार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,बहिण मनीषा हिचा विवाह २०१४ मध्ये सागर सोनार (पल्लीवाल) यांचेशी झाला होता.सागर सोनार हे पुणे
येथे नौकारीस होते मात्र कोरोनाच्या संकटामुळे ते एरंडोल येथे राहण्यास आले होते.पुणे येथे नौकरी लागल्यामुळे सागर सोनार हे पुणे येथे राहत होते तर त्यांची पत्नी मनीषा हि एरंडोल येथेच राहत होती.मनीषाच्या विवाहानंतर पती सागर सोनार,सासू मंगला पल्लीवाल,जेठ गणेश पल्लीवाल,जेठाणी सुषमा पल्लीवाल हे मनीषाच्या चारित्र्यावर संशय घेवून तिचा मानसिक शारीरिक
त्रास देत होते.पतीसह सासरचे लोक चारित्र्यावर संशय घेवून मानसिक व शारीरिक देत असल्यामुळे मनीषाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे
दरम्यान मनीषा यांचेवर सायंकाळी कासोदा रस्त्यावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.याबाबत मयत मनिषाचे भाऊ मनोज पोतदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती सागर पल्लीवाल (सोनार),सासू मंगला पल्लीवाल,जेठ गणेश पल्लीवाल, जेठाणी सुषमा पल्लीवाल यांचेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पती व जेठ यांना ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड तपास करीत आहेत.