सदस्य नोंदणीसाठी प्रत्येकाने जबाबदारीने कर्तव्य पार पाडावे..आमदार अमोलदादा पाटील; एरंडोल येथे सदस्य नोंदणी व आढावा बैठक संपन्न.

Spread the love

एरंडोल :- शिवसेनेच्या शिवकार्य अभियान अंतर्गत सुरू असलेल्या सदस्य नोंदणी बाबत आज एरंडोल येथे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख प्रा.मनोज पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदामतात्या राक्षे, तालुकासंघटक संभाआबा पाटील, तालुकाप्रमुख रविभाऊ जाधव, धरणगांव बाजार समिती मा.सभापती शालिकभाऊ गायकवाड, मा.सभापती गबाजीआण्णा पाटील, दादाजी पाटील, जिल्हा दुध संघाचे संचालक दगडु चौधरी, धरणगांव बाजार समिती उपसभापती किरणदादा पाटील, मा.उपनगराध्यक्ष कुणाल महाजन, अतुल महाजन, रूपेशदादा महाजन, मा.तालुकाप्रमुख बबलुदादा पाटील, युवासेना तालुकाप्रमुख कमलेश पाटील, एरंडोल शहरप्रमुख बबलुदादा चौधरी, शहरसंघटक मयुर महाजन यांचेसह शिवसेना, युवासेना आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

या आढावा बैठकीस उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते मा.ना. एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणूकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासासाठी युवक व महिलांचे मजबूत संघटन करण्याचे आवाहन यावेळी केले. गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक हा उपक्रम राबवून एरंडोल मतदारसंघातून सर्वाधिक सदस्य नोंदणीसाठी प्रत्येकाने जबाबदारीने कर्तव्य पार पाडावे असे आवाहन केले.

मुख्य संपादक संजय चौधरी