एरंडोल पोलिसांनी पकडला मोटार सायकल चोर.

Spread the love

एरंडोल | प्रतिनिधी : – एरंडोल पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारावर एक मोटार सायकल चोरास मोठ्या शिताफीने पकडले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की दि.१९ मे रोजी एरंडोल तालुक्यातील कढोली येथील किशोर सुरेश बडगुजर वय 36 यांची एच एफ डिलक्स कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम.एच.१९ सी.एन.१७७२ ही चोरीस केली होती.तशी फिर्याद त्यांनी एरंडोल पोलिस स्टेशनला दिली होती.एरंडोल पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत गोपनीय माहितीच्या आधारे पारोळा तालुक्यातील टिटवी येथील संशयित आरोपी दिलीप शांताराम पाटील यास भडगाव तालुक्यातील बांबरुड (महादेवाचे) येथून ताब्यात घेतले आहे.दरम्यान शहर तथा तालुक्यातील अनेक ठिकाणी दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या असून आरोपी कडून अजून काही दुचाकी चोरीच्या उलगडा होईल.
पुढील तपास पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ.महेंद्रसिंग पाटील,पो. ना. दत्तात्रय ठाकरे करीत आहेत.

मुख्य संपादक संजय चौधरी