पारोळा :- मा.आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या अथक प्रयत्नांतुन व आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या संकल्पनेतुन शेती व गावठाणसाठी विजेच्या उद्भवणाऱ्या समस्या कायमस्वरूपी सोडविणेसाठी तालुक्यातील शिरसमणी येथे ५.३३ कोटी रूपयांचा ३३ केव्ही क्षमतेचा उपकेंद्राला मंजुरी मिळवुन आणली होती. यासाठी आमदार मा.अमोलदादा पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून प्रशासकीय बाबी पुर्ण करून घेतल्या. आज या उपकेंद्राचे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले.
प्रसंगी आडगांव येथील उपसरपंच डी.एन.पाटील सर, डॉ.सुधाकर महाजन, भोंडणदिगर सरपंच सुधाकर पाटील, शिरसमणी येथील बाळु पाटील, चेतन पाटील यांचेसह महावितरण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शिरसमणीसह पंचक्रोशितील स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
या ३३ केव्ही उपकेंद्राचा कामामुळे शिरसमनी, भोंडणदिगर, टिटवी, चोरवड, पोपटनगर या परिसरातील गावठाण व शेतीला मोठा लाभ होणार आहे. कमी दाबाचा पुरवठ्यासह अन्य विजेचा समस्यांमुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती. आता या उपकेंद्रातुन या सर्वच समस्यांना पुर्णविराम लागणार असल्याचे आमदार मा.अमोलदादा पाटील यांनी बोलतांना सांगितले.
यासह मतदारसंघातील उर्वरित विद्युत प्रकल्पांना गतीने पुर्ण करून विज ग्राहकांना सेवा देण्यात सूलभता आणण्यासाठी उपाययोजना करण्याचा सुचना आमदार मा.अमोलदादा पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.