जळगाव :- पारोळा तालुक्यातील ४ शेतकऱ्यांची शेती महामार्गाच्या कामात गेल्यामुळे व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शेतीचे दर कमी दिल्याने या शेतकऱ्यांचा १० वर्षांपासून वाढीव मोबदला मिळावा म्हणून लढा सुरू होता. आता जळगाव दिवाणी न्यायाधीश एस. एस. परदेशी यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या विरुद्ध निकाल दिल्यानंतर कार्यालयातील वस्तू जप्तीचे आदेश केले होते. त्यानुसार गुरुवारी दि. १९ जून रोजी दुपारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयातील सर्व साहित्य शेतकऱ्यांनी वकिलांच्या उपस्थितीत कार्यालयात जाऊन जप्त करण्यात आले.
सन 2011 मधील अधिसूचनेप्रमाणे मौजे पारोळा तालुक्यातील करंजी व दळवेल शिवारातील शेतकऱ्यांची जमीन राष्ट्रीय महामार्गाकामी सक्षम प्राधिकारी अंमळनेर यांचेकडील निवड्यानुसार सन 2013 मध्ये संपादित झाले होते त्यांना अत्यंत कमी नुकसान भरपाई मिळाल्यामुळे त्यांनी मा. जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे वाढीव मोबदला मिळणे कामी अर्ज दाखल केले होते सदर अर्जावरील निकाल सन 2019 मध्ये होऊन वाढीव रक्कम मंजूर झाली तसेच वाढीव मोबदला रकमेवर माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या तरसेमसिंग विरुद्ध एन एच ए आय या केसमधील अंतिम निकालानुसार दिलासा रक्कम व त्यावरील व्याज देण्यात येईल असे आदेशात म्हटले होते
त्यानंतर 4 फेब्रुवारी 2025 रोजी मा.सर्वोच्च न्यायालयातील तरसेमसिंग विरुद्ध एन एच आय या केस चा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागला त्यानुसार सदर शेतकऱ्यांनी मा जिल्हा न्यायालय जळगाव येथे तरसेमसिंग विरुद्ध इंडियन ऑफ इंडिया एन एच ए आय केसच्या निकालाप्रमाणे दिलासा रक्कम व त्यावरील व्याज मिळणे कामी दरखास्त दाखल केली होती सदर दरखास्त मध्ये माननीय न्यायाधीश शरद परदेशी साहेब वरिष्ठ स्तर जळगाव यांनी सदरची रक्कम शेतकऱ्यांना वसूल करून मिळणे कामी जंगम जप्ती वॉरंट चे आदेश पारित केले
सदर जंगम जप्ती वॉरंट च्या आदेशानुसार मौजे दळवेल तालुका पारोळा येथील श्री युवराज ओंकार पाटील आणि जगन्नाथ सिताराम पाटील तसेच करंजी तालुका पारोळा येथील संजय हिम्मत पाटील आणि संजय राजधर पाटील या शेतकऱ्यांनी मा. न्यायालयाचे बेलीफ श्री चंदनकर व रोटे भाऊसाहेब यांचे सह व त्यांचे वकील अँड तुषार प्रकाश पाटील अँड रघुवीर सिंग पाटील अँड ओम त्रिवेदी अँड सुनील माळी अँड धीरज जैन अँड प्रफुल्ल महाले यांचे सह एन एच आय प्रकल्प संचालक कार्यालय शिव कॉलनी जळगाव येथे जाऊन न्यायालयाच्या आदेशाची प्रत दाखवून टेबल खुर्ची इत्यादी साहित्य पंच सुनील नवल गिरासे दळवेल आणि संभाजी भटू पाटील राहणार दळवेल यांचे समक्ष जप्त केले आणि माननीय न्यायालयाचे नाझर तथा सहाय्यक अधीक्षक माननीय श्याम शिंदे भाऊसाहेब यांच्याकडे जमा केले