पारोळा : – महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा वतीने व आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या अथक प्रयत्नांतुन २५ मे पासुन एरंडोल विधानसभा मतदारसंघातील बांधकाम कामगारांची बायोमेट्रीक नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला होता. या बायोमेट्रीक नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांना आज आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते संसारोपयोगी भांड्यांचा सेट वितरित करण्यात आला.
याप्रसंगी शहरप्रमुख अमृतभाऊ चौधरी, शेतकी संघाचे मा.उपाध्यक्ष प्रकाशनाना पाटील, कैलास पाटील, योगेश पाटील, कोमल पाटील, प्रविण चौधरी, मयुर भोई, महेंद्र बारी, कासोदा येथील मयुर पाटील, अमोल पवार, भुषण शेलार, रंगराव पाटील सर, पुरूषोत्तम पाटील सर यांचेसह आदी मान्यवर, बांधकाम कामगार उपस्थित होते.
एरंडोल विधानसभा मतदारसंघात सुरू केलेल्या बायोमेट्रीक KYC नोंदणीत एकुण १० हजारांपेक्षा अधिक बांधकाम कामगारांनी नोंदणी केलेली आहे. आजपासुन या बायोमेट्रीक KYC केलेल्या बांधकाम कामगारांना प्रत्यक्षात संसारोपयोगी भांड्यांचे वाटप होत आहे. दैनंदिन माझ्या कार्यालयाकडुन ५०० लोकांना त्यांचा नोंदणी केलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधुन त्यांना संसारोपयोगी भांडे घेवुन जाण्याचे सांगण्यात येत आहे, अशा प्रकारे जेवढ्या लोकांनी बायोमेट्रीक KYC नोंदणी केली आहे, त्या सर्वांनाच लाभ होणार आहे. तसेच नविन बायोमेट्रीक KYC नोंदणीचे संकेतस्थळ बंद असुन ते देखील सुरू झाल्यास नविन नोंदणी करण्याचा विचार असल्याचे मत आमदार अमोलदादा पाटील यांनी यावेळी मांडले.
मागील वर्षी पासून बांधकाम कामगारांकरिता सरकार विविध उपक्रम राबवित आहेत.
राज्यातील प्रत्येक गरीब व्यक्ती हा विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्याकरिता बांधकाम कामगार योजना व त्यासारख्या असंख्य योजना सरकार राबवित आहेत. बांधकाम कामगार हा महाराष्ट्राच्या विकासातील एक महत्वपूर्ण घटक आहे.
राज्यामध्ये २०२० मध्ये बांधकाम कामगार योजनेची सुरुवात करण्यात आली होती. त्यामधीलच एक कार्यक्रम म्हणजे संसारोपयोगी भांडे वाटप आहे. ही योजना महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळा मार्फ़त संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे.
योजने मार्फ़त पात्र बांधकाम कामगारांना भांड्यांचा संच मोफत मिळणार आहे. ज्या कामगारांना स्वयंपाक बनविण्याकरिता उपयुक्त ठरणार आहेत. योजनेमार्फ़त महाराष्ट्र राज्यात आत्तापर्यंत ५ लाखांपेक्षा अधिक नोंदीत बांधकाम कामगारांनी लाभ घेतला आहे.