विकसित भारताच्या अमृतकाळ सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची ११ वर्षे भाजपा अंतर्गत विखरण -रिंगणगाव मंडळात संकल्प सभेचे आयोजन.

Spread the love

एरंडोल :- भारतीय जनता पार्टी एरंडोल तालुक्याच्यावतीने पिंपळकोठा येथे विकसित भारताचा अमृत काळ, सेवा, सुशासन, गरीब कल्याना ची 11 वर्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र अंतर्गत विकसित भारत संकल्प सभा हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.आमदार बापूसाहेब महेंद्रसिंग पाटील होते. या संकल्प सभेस जळगाव जिल्हा (पश्चिम) अध्यक्ष डॉ. राधेश्यामजी चौधरी यांनी संबोधित केले. तर एरंडोल – विखरण – रिंगणगाव मंडळाचे अध्यक्ष श्री. योगेश बापू महाजन, श्री.एस.आर. बापू पाटील, श्री. नानाभाऊ महाजन यांनी मोदी सरकारने केलेल्या कार्या बद्दल सविस्तर माहिती सांगितली.

अध्यक्षीय भाषण माजी आमदार श्री. महेंद्रसिंग बापू पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन श्री. अमरजितसिंग पाटील यांनी केले. तसेच संकल्प सभेनंतर वृक्ष रोपणाचाही कार्यक्रम घेण्यात आला त्यानंतर मोदी सरकारने केलेले विविध विकास कामे, योजना व त्यांनी केलेल्या कार्यावर उजाळा टाकण्यासाठी बॅनर प्रदर्शनी मांडण्यात आले होते. त्याप्रसंगी श्री. भिका भाऊ कोळी, सौ. पल्लवीताई पाटील, श्री समाधान भाऊ पाटील,श्री. निलेश भाऊ परदेशी, श्री. अविनाश जाधव, श्री. अजित दादा पाटील, श्री. रवींद्र पाटील पारोळा,एडवोकेट मधुकर देशमुख,श्री. प्रमोद भाऊ महाजन, श्री. संजय भाऊ महाजन, श्री. अरुण भाऊ महाजन, श्री. गोपाल अण्णा महाजन, श्री. जगदीश भाऊ ठाकूर, डॉ.नरेंद्र ठाकूर, श्री. निखिल भाऊ सूर्यवंशी, श्री. मयूर ठाकूर,भारतीय जनता पार्टीचे एरंडोल शहरातील व तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते व ह्या कार्यक्रमाच्या समितीचे संयोजक श्री. संदीप भाऊ पाटील हे होते.

मुख्य संपादक संजय चौधरी